file photo 
विदर्भ

सोशल मीडियावरील "प्रचार' उमेदवाराच्या खर्चात 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी रॅली, प्रचारसभा, पदयात्रेसोबत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर निवडणूक विभागाचे लक्ष असून, यावरील खर्च हा उमेदवारांच्या खात्यात जोडला जाणार आहे. 
प्रचार, प्रसारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. उमेदवार, इतर पक्षाची बदनामी करण्यासाठीही सोशल मीडियाचा वापर होत आहे. प्रथम सोशल मीडियावर निवडणूक आयोगाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांच्या सोशल अकाउंटची माहिती घेण्यात आली आहे. उमेदवारांच्या अकाउंटवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती नियुक्त केली आहे. यात सायबर सेलचे पोलिस उपायुक्त, सायबर एक्‍सपर्ट, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक आदींचा समावेश आहे. सोशल मीडियावर येणारे पोस्ट यावर समितीमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजकीय पक्ष, खासगी संस्था आणि उमेदवारांकडून येणाऱ्या वैयक्तिक पोस्टवरही सायबर सेलचे लक्ष आहे. राजकीय आणि गुन्हेगारी स्वरूप अशी वर्गवारी यात करण्यात येत आहे. सायबर सेलकडून अहवाल एमसीएमसी समितीला सादर होणार आहे. एमसीएमसी मार्फत सोशल मीडियावर होणारा खर्च निश्‍चित करण्यात येणार असून, त्यांच्या सूचनेवरून आचारसंहिता भंगाची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर बदमानी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता, हे विशेष. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT