Explosion in walking trawls in Amravati district 
विदर्भ

मध्यरात्रीचा थरार : चालत्या ट्रॅव्हल्समध्ये स्फोट; राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील घटना

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : तिवसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मध्यरात्री सुमारे दोन वाजता रायपूरवरून सूरतला जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या ट्रॅव्हल्समध्ये अचानक स्फोट झाला. यात कुठलीही जीवित हानी झाली नसून आग विझविण्यात तिवसा नगरपंचायत अग्निशामक वाहनाला यश आले.

प्राप्त माहितीनुसार, नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने सीजी-19 एफ-०२३१ क्रमांकाची ट्रॅव्हल्स सूरतला जाण्यासाठी निघाली. तिवसा पोलिस ठाण्यासमोरून जात असताना अचानक ट्रव्हेल्समध्ये स्फोट झाला. ही बाब समजताच ट्रॅव्हल्समधील दोन वाहन चालक व दोन हेल्पर यांनी सर्व प्रवाशांना जागे करून बाहेर काढले.

यानंतर त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांना काहीही करता आले नाही. क्षणातच घटनास्थळी आगीचे तांडव पाहायला मिळाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

आग विझविण्यात तिवसा नगरपंचायत अग्निशामक वाहनाला यश आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक रिता उईके यांनी धाव घेतली. मदतीसाठी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच या आगीवर नियंत्रन मिळवता आले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

Beed News: इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी विरोधात बीडमध्ये एल्गार पँथर सेना आणि आंबेडकर विकास मंच आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT