Extermination of five Naxalites in Khobramendha forest of Gadchiroli
Extermination of five Naxalites in Khobramendha forest of Gadchiroli 
विदर्भ

गडचिरोलीत पोलिसांना मोठं यश; जहाल नक्षली भास्कर हिचामीचा खात्मा; पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान

मिलिंद उमरे

गडचिरोली : येथील पोलिस उपविभाग कुरखेडाअंतर्गत येणाऱ्या पोलिस मदत केंद्र मालेवाडा हद्दीच्या खोब्रामेंढा जंगलात सोमवारी (ता. २९) सकाळी ७.३० ते ८ वाजता झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी याला दुजोरा दिला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये ३ पुरुष व २ महिला नक्षलवादी असल्याची माहिती पाटील यांनी दिली. यात एका जहाल नक्षलवाद्याचाही समावेश आहे. 

आज भल्या सकाळी कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा परिसरातील पानडोंगरी जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. यात नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा सचिव भास्कर हिचामी, अस्मिता, अमर, सुखदेव आणि सुजाता यांचा समावेश आहे. 

शनिवार, २८ मार्चपासून पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहे. आतापर्यंत दोन चकमकी झाल्या आहे. शनिवारी सुमारे एक ते दीड तास चाललेल्या चकमकीत पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. तीन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली आहे.

खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले असून, ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली होती. तेव्हा अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते.

शनिवार, २८ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांना ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे ६० ते ७० मिनिटे चाललेल्या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर पोलिस-नक्षलवादी यांच्यात सोमवारी सकाळी पुन्हा चकमक झाली. यात पाच नक्षलवादी ठार झाले आहेत.

म्होरक्या भास्करचा खात्मा  

२०१९ मध्ये दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीची प्रमुख नर्मदाक्का हिला पोलिसांनी तिच्या पतीसह अटक केल्यानंतर जिल्ह्यातील नक्षल चळवळीची सर्व सूत्रे भास्कर हिचामी याच्याकडेच आली होती. परंतु आज त्याचा खात्मा करण्यात आला. हा नक्षल्यांना मोठा धक्का आहे. ठार झालेल्या नक्षल्यांचे मृतदेह आज दुपारी गडचिरोली येथील पोलिस मुख्यालयात आणण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

SRH vs GT Live Score : हैदराबादमध्ये पुन्हा पावसाचं थैमान; नाणेफेकच काय सामन्यावरही दाटले ढग

SCROLL FOR NEXT