File photo
File photo 
विदर्भ

"रमाई'च्या अनुदानावर डोळा

सकाळवृत्तसेवा

"रमाई'च्या अनुदानावर डोळा
नागपूर : नवबौद्ध व अनुसूचित जातीतील दारिद्य्ररेषेखालील गरिबांना घरे मिळावी, या हेतूने राज्य सरकारने सुरू केलेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत अनुदानावर समृद्ध घरमालकांचाही डोळा असल्याचे दिसून आले. त्यांचे अर्ज फेटाळले तरी मंजूर अर्जातही समृद्ध लाभार्थ्यांचा समावेश असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यामुळे झोन कार्यालयाच्या प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
रमाई आवास योजनेअंतर्गत बीपीएल व एपीलधारकांना घरांसाठी अनुक्रमे अडीच व सव्वादोन लाख रुपये दिले जातात. नुकतेच राज्य सरकारने 2018-19 या वर्षासाठी आणखी एक लाख घरांसाठी मंजुरी दिली. मात्र, अद्याप मागील वर्षीची प्रकरणे मार्गी लागली नाही. या योजनेच्या लाभासाठी मागील वर्षी दहाही झोन कार्यालयांत एकूण चार हजार 737 अर्ज आले होते. या अर्जदारांची सत्यता तपासण्यासाठी महापालिकेने आठ एजन्सी नियुक्त केल्या आहेत.
झोन कार्यालयांतील अभियंता व इतर अधिकारी रमाई योजनेचे अर्ज मंजूर करतात. सर्वेक्षणानंतर 1,688 अर्ज बोगस आढळले. या अर्जदारांनी संपर्कासाठी जो पत्ता दिला, तेथे कुणीही आढळले नाही. हे अर्ज वगळून महापालिकेच्या दहाही झोन कार्यालयानी एकूण तीन हजार 49 अर्जाबाबत प्रक्रिया सुरू केली. यात ज्यांची पक्के घरे आहेत, असे एक हजार 110 अर्ज आढळले. गरिबांसाठी असलेल्या योजनेवर समृद्ध घरमालकांचा डोळा असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. झोन कार्यालयांनी हे अर्ज फेटाळले. परंतु, मंजूर केलेल्या एक हजार 115 अर्जांच्या प्रक्रियेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मंजूर अर्जांपैकी 824 अर्जांवर प्रक्रिया सुरू असून, सर्व कागदपत्रे तपासण्यात येत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या योजनेअंतर्गत बीपीएल व एपीएलधारकांना अनुक्रमे दोन लाख व एक लाख 80 हजार रुपये मिळत होते. यात आता 45 ते 50 हजारांची वाढ झाल्याने बोगस लाभार्थीही वाढण्याची शक्‍यता आहे. महापालिका झोन कार्यालयातील अधिकाऱ्यांची वृत्ती बघता यात गैरप्रकाराची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.  
दुसऱ्या टप्प्यात तीन हजार 454 अर्ज
तीन महिन्यांपूर्वी या योजनेचा दुसरा टप्पाही सुरू झाला असून, यात तीन हजार 454 अर्ज आले आहेत. यात सर्वाधिक आशीनगर झोनमध्ये 1,171 अर्जांचा समावेश आहे. याशिवाय लक्ष्मीनगर झोनमध्ये 305, धरमपेठमध्ये 319, हनुमाननगरात 126, धंतोली 179, नेहरूनगरात 268, गांधीबागमध्ये 217, सतरंजीपुरामध्ये 391, लकडगंजमध्ये 281, मंगळवारीमध्ये 197 अर्ज आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT