File photo
File photo 
विदर्भ

पासपोर्टसाठी बनावट शाळेचा दाखला

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पासपोर्ट बनविण्यासाठी आरोपीने नागपुरातील एका शाळेचा बनावट दाखला जोडला. तो दाखल खरा असल्याचे भासवून पासपोर्ट तयार करून शासकीय कार्यालयाची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घनबहादूर एम. घनबहादूर खडका (वय 31) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घनबहादूर खडका हा शुक्रवारी रोड, गाडीखाना, खिसलालवाडी, नागपूर येथे राहत होता. त्याला नोकरीसाठी विदेशात जायचे असल्याने त्याला पासपोर्ट बनवायचा होता. ऑक्‍टोबर 2014 मध्ये पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जासोबत त्याने बुद्धनगर, कामठी रोडवर असलेल्या न्यू इंदिरा कॉव्हेंट या शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतल्याबाबत शाळेचा दाखला जोडला होता. तो दाखला बनावट होता. तरीही त्या दाखल्यावर पासपोर्ट तयार करीत शासकीय कार्यालयाची फसवणूक केली. गेल्या पाच वर्षांपूर्वी काढलेल्या पासपोर्टची पडताळणी करण्यासाठी अर्ज गणेशपेठ पोलिस ठाण्यात आला. गणेशपेठ पोलिसांना शाळेचा दाखला बनावट असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पासपोर्ट कार्यालयाला कळवून माहिती दिली. तसेच पोलिस शिपाई दादाजी जांभूळकर यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 2014 मध्ये आरोपी घनबहादूर हा किरायाने राहत होता. 2016 मध्ये तो शहर सोडून निघून गेला. त्यामुळे सद्यःस्थितीत आरोपी कुठे आहे, याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नाही. आरोपीचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT