विदर्भ

Vidhan Sabha 2019  : ‘चुलीत गेलं तुमचं राजकारण’

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 
नागपूर - विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग करू नये याबाबतच्या सूचना देणारे पत्र पोलिसांकडून राजकीय कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले आहे. यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. राजकारणात असल्याने पोलिसांचे पत्र घरी आल्यावर ‘चुलीत गेलं तुमचं राजकारण’ असे बोल कार्यकर्त्यांना कुटुंबीयांकडून ऐकावे लागत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पोलिसांकडूनही सूचना देण्यात आल्या आहेत. मोवाड येथील काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नरखेडचे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे यांनी सूचना पत्र पाठवून आचारसंहितेचा भंग करू नये, अन्यथा कारवाई करण्याचे खबरदारी पत्र पाठविल्याची माहिती आहे. इंगळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मोवाड चौकीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी यास दुजोरा दिला. मोवाड येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दिलीप बानाईत व युवासेनेचे ललित खंडेलवाल  या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कुटुंबीयांनी राजकारणावरून चांगलेच सुनावले.

सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. 

सोशल मीडियावर हे पत्र टाकल्यावर कोणताही आक्षेपार्ह मजकूर न टाकण्याचे आवाहन  ग्रुप ॲडमिन करू लागले आहेत. नरखेड तालुक्‍यातील कार्यकर्त्यांनाच असे पत्र मिळाल्याचे सध्यातरी समोर आले आहे. इतर तालुक्‍यातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधल्यावर अद्याप असे पत्र आले नसल्याची माहिती मिळाली आहे.

घरी पत्र पाठविण्यापेक्षा ठाणेदारांनी शांतता कमिटीची बैठक घेऊन एकत्रितपणे अशा सूचना द्यायला हव्या होत्या. घरी पत्र पाठविल्यामुळे कुटुंबीय दबावात आले आहे. कार्यकर्ता म्हणून आम्ही केवळ पक्षाचा प्रचार करतो.
- दिलीप बानाईत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मोवाड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात नागरिक तर सोडाच, आमदारही असुरक्षित? काँग्रेस आमदाराला १० कोटीची डिमांड, पोलिस प्रशासनाची चुप्पी

Shiv Jayanti In Paris : पॅरिसच्या मुख्य चौकात 'जय शिवराय'चा जयघोष! युरोप दौऱ्यावर गेलेल्या ५२ शेतकऱ्यांनी सातासमुद्रापार साजरी केली शिवजयंती

राग अन् वासनेतून तरुण खुळावला; आधी प्रेयसीला मारलं, नंतर मृतदेहासोबत नको ते केलं, घटनेनं पोलिसही हादरले

Akola News : नरनाळा महोत्सवाप्रमाणे पैसे उकळण्यासाठी वऱ्हाडी जत्रेचा घाट? पहिल्याच दिवशी अकोलेकरांची पाठ

Nagpur Crime : ‘मी गुन्हेशाखेतून बोलतो, तुमच्या मुलाला अटक केली आहे’, ड्रायव्हरची ९ हजार रुपयाने सायबर फसवणूक

SCROLL FOR NEXT