Family refused to accept the death body of Indian Javan in karanja vashim
Family refused to accept the death body of Indian Javan in karanja vashim 
विदर्भ

जवानाचे पार्थिव स्विकारण्यास कुटूंबियांचा नकार; घातपात झाल्याचा कुटूंबियांचा आरोप 

सकाळवृत्तसेवा

वाशीम: कारंजा येथील सिमा सुरक्षा दलाचा जवान सुनिल विठ्ठल धोपे याचा मेघालयातील शिलाॅग येथे शनिवारी  (ता.15) मृत्यू झाला होता. या जवानाचा मृत्यू अपघात नसून तो घातपात असल्याचा आरोप करीत कुटूंबियांनी शवविच्छेदन अहवाल पाहिल्याशिवाय जवानाचे पार्थिव स्विकारण्यास नकार दिला आहे. दुपारपासून मंदिराच्या प्रांगणात पार्थिव ठेवलेले आहे. 

कारंजा येथील सिमा सुरक्षा दलाचा जवान सुनिल विठ्ठल धोपे  (वय 37) हे शिलाॅग येथील कॅम्पबाहेर मृतावस्थेत आढळून आल्याची सिमा सुरक्षा दलाने सुनिल धोपे यांच्या कुटूंबियांना दिली होती. दरम्यान त्यांचे पार्थिव   कारंजा येथे येण्याआधी कुटूबियांकडून कारंजा पोलिसात तक्रार करून हा घातपात असल्याचा आरोप केला. आज (ता. 17) दुपारी सीमा सुरक्षा दलाच्या वाहनातून जवान सुनिल विठ्ठल धोपे याचे पार्थिव कारंजा येथे आणण्यात आले. मात्र यावेळी कुटूंबियांनी मृतक जवानाच्या शवविच्छेदन अहवालाची मागणी केली तो अहवाल नसल्याने कुटूंबियांनी जवानाचे पार्थिव स्विकारण्यास नकार दिला आहे. दुपारपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार्थिव कारंजा येथील मंदिरासमोरील मंडपात ठेवण्यात आले आहे. घटनास्थळी हजारोंचा जमाव जमला असून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक कारंजा येथे तळ ठोकून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT