farmer Baliraja worried larvae on onion cloudy weather sakal
विदर्भ

कांद्यावरील अळीमुळे बळीराजा चिंतातूर

ढगाळ वातावरणाचा परिणाम, उत्पादनात होणार घट

संतोष थोरहाते

हिवरा आश्रम : यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरण, विहिरीच्या जलपातळीत वाढ झाली. शेतीसाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्यामुळे अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळल्याचे विधायक चित्र हिवरा आश्रम परिसरात दिसून येत आहे. हिवरा आश्रम परिसरातील शेतकऱ्‍यांनी कांदा पिकाची मोठया प्रमाणात लागवड केली. कांदा हे पिक भाजी वर्गीय असून व्यापारीदृष्ट्या या पिकाला चांगले महत्व आहे.

सद्या कांदा पिक ऐन जोमात असताना या पिकावर अळी व किडीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकावर ऐन पिक जोमात असताना आळी पडल्यामुळे शेतकरी हवादिल झाला आहे. कांदा पिकावरील अळीचे नियत्रंण करण्यासाठी त्यांची धावपळ दिसून येत आहे. यावर्षी अगोदरच शेतीचे संपूर्ण अर्थकारण बिघडल्यामुळे शेतकऱ्‍यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अगोदरच खरिपात शेतकऱ्‍यांच्या मूग, उडीद पिकांचे नुकसान झाले. तर सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी व परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी पावसाच्या खरिपातील पिकाला फटका बसल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली.

आता रब्बीच्या पिकावर शेतकऱ्‍यांची भिस्त असताना कांदा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन घटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. सद्या कांदा पिकावर किडीचा व अळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात दिसून येत असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. कांदा पिकावर महागडी औषधांची फवारणी करून कांदा पिक वाचविण्यासाठी बळीराजाचे प्रयत्न सुरू आहे.

ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात

ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर मोठया प्रमाणात अळी व किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. कांदा पिकावर अळी व किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. पिकांवर कीड व अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांचे नुकसान होऊन रब्बीचे पिके धोक्यात आली आहे.

३ एकरांमध्ये कांदा लागवड केली आहे. कांदा पिक जोमात होते. मात्र गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर अळीचा व फुलकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे कांदा पिकाचे नुकसान होत असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

- शरद देशमुख,कांदा उत्पादक शेतकरी, दुधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Sheikh: येत्या काळात महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू; सहर शेख यांना पाठिंबा देत इम्तियाज जलीलांचे वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?

Badrapur Crime : पत्नीचा खून केल्याच्या संशयावरून पतीला घेतले ताब्यात; हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा केला बनाव

Bigg Boss Marathi 6: शिवी घालण्यावरून प्राजक्ता- अनुश्री रितेशसमोरच भिडल्या ; "म्हणजे शिवी द्यायची का?"

Mumbai Goa Highway Traffic : सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे वाहतूक कोंडीचे विघ्न! मुंबई गोवा महामार्गासह इतरही ठिकाणी वाहतूक कोंडीने पर्यटक प्रवासी बेजार

IndiGo Flights Cancelled : सरकारचा ‘इंडिगो’ला आणखी एक मोठा दणका! तब्बल ७०० हून अधिक उड्डाणे केली आहेत कमी

SCROLL FOR NEXT