file photo 
विदर्भ

शेतकरी झाला हताशः  कपाशीवर पातीगळ, सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव

चेतन देशमुख

यवतमाळ : सध्या शेतातील पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र, आता पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. कापसावर नैसर्गिक पातीगळ, रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनवर खोडकीड, चक्रीभुंगा व उडीद पिकावर भुरी रोगाचे आक्रमण झालेले आहे. दरम्यान, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे ठाकल्याने शेतकरी चिंतित झालेले आहेत. 

जिल्ह्यात कापसासोबतच आता सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. दोन्ही पिके शेतकऱ्यांच्यादृष्टीने पैसा देणारी ठरलेली आहेत. त्यामुळे इतर शेतपिकांच्या तुलनेत जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन व कापसाला प्राधान्य देत आहेत. यंदा जिल्ह्यातील साडेचार लाख हेक्‍टरवर कापूस, तर अडीच लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड झालेली आहे. शेतपिके वाढीच्या अवस्थेत चांगला पाऊस झाला. परिणामी कापसाची पातीगळ काही भागांत दिसली. निसर्गाच्या या संकटामुळे शेतकरी चिंतातूर झालेले होते. सतत ढगाळ वातावरण असल्याने शेतपिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणींत सापडलेले पाहावयास मिळत आहेत. सध्या सोयाबीन या पिकावर खोडमाशी व चंक्रीभुंगा या कीडींनी आक्रमण केलेले आहे. जिल्ह्यातील काही भागांत खोडमाशींचा प्रादुर्भाव मोठा आहे. काही भागांतील काही शेतांमध्ये हा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. याशिवाय आभाळामुळे अळीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. कापसावरही ढगाळ वातावरणामुळे रसशोषक कीड व नैसर्गिक पातीगळ दिसून येत आहेत. उडीद पिकावर भुरी रोग दिसून येत आहे. शिवाय, कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव काही भागात दिसत आहे. शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने कीडनियंत्रण केल्यास त्याचा फायदा लवकर होईल, असे मत कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
 

  • कोणत्या पिकांवर कोणती कीड
  • कापूस - काही भागांत तुडतुडे, गुलाबी बोंडअळी, रसशोषक कीड.
  • रोग- पातीगळ
  • सोयाबीन -चक्रीभुंगा, अळी, खोडकीड

सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांनी हा रोग पसरू नये, यासाठी टेबूकोनाझोल 10 मिली, सल्फर 65 25 ग्रॅम, दहा लिटर पाण्यात फवारणी करावी, सोयाबीन पिवळे झाले असल्यास ही फवारणी करावी. सध्या चक्रीभुंगा, खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याशिवाय, कपाशीवर रसशोषण करणारी कीड दिसत आहे. यांचे नियोजन शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्यानुसार करावे.
- डॉ. प्रमोद नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ.


कपाशीसाठी काय करावे?
कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करून डोमकळ्या दिसून आल्यास त्या अळीसह नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठी हेक्‍टरी पाच कामगंध सापळे लावावे. कीटकनाशकांची फवारणी करावी.

-सोयाबीन पिकासाठी
सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी यांचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरणाने अळ्यांचे प्रमाण वाढत आहे. अशास्थितीत शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT