Farmer commits suicide
Farmer commits suicide 
विदर्भ

इंझोरी येथे गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

इंझोरी (वाशीम) कुटुंबातील सर्वजण शेतात कामावर गेल्यानंतर घरी एकट्याच असलेल्या शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.22) मानोरा तालुक्‍यातील इंझोरी येथे उघडकीस आली. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, येथील दत्ता रामचंद्र हळदे (वय60) यांच्या कुटुंबाकडे सामाईक 11 एकर शेती आहे. त्यापैकी त्यांच्यानावे पाच एकर शेती आहे. अशातच आज सकाळी घरातील सर्वजण शेतात कामाकरिता गेल्यानंतर, त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब सायंकाळी पाच वाजता कुटुंबातील सदस्य घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र, आत्महत्येचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. सदरील आत्महत्या नापिकीच्या नैराश्‍यातून केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून असे कुटुंब आहे. या घटनेमुळे गाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात मतदाराने चक्क ईव्हीएम पेटवली; तरुण पोलिसांच्या ताब्यात

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

SCROLL FOR NEXT