Farmer commits suicide due lack of productivity heavy rain crop damage vidarbha esakal
विदर्भ

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

साहूर येथील घटना, आष्टी पोलिसात मृत्यूची नोंद

सकाळ वृत्तसेवा

आष्टी : घरात अठरा विश्व दारिद्र्य, त्यात सततची नापिकी आणि यंदा झालेली अतिवृष्टीने हताश झालेल्या वृद्ध शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील साहूर येथे उघडकीस आली. मधुकर टीकाराम गणेसर (वय ८५) असे मृत अस्पभुधारक शेतकऱ्याचे नाव आहे. माहितीनुसार साहूर येथील अल्पभूधारक शेतकरी मधुकर टीकाराम गणेसर यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. पत्नी, दोन मुले, दोन सुना व नातवंड असा त्यांचा परिवार. मधुकर गणेसर यांचं अगदी लहानपणापासून उभ आयुष्य कष्टात गेलं. कुटुंबासाठी ढोरमेहनत घेतली.मात्र शेतीने दगा दिला.

यंदा अतिवृष्टीने त्यात भर घातली. खासगी उधारीची परतफेड कशी करायची तसेच कुटुंबाचा दैनंदिन खर्च कसा चालवावा या विवंचनेत असताना मधुकर गणेसर घराशेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही बाब रात्री दोन वाजता घरच्यांच्या लक्षात येतात त्यांनी शोधाशोध केली असता त्यांची काडी आणि चप्पल विहिरीजवळ पडून असल्याने त्यांनी विहिरीत आत्महत्या केली असल्याचे लक्षात आले काही गावकरीही घटनास्थळी जमले यावेळी गावकऱ्यांच्या मदतीने घरच्यांनी आष्टी पोलिस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी आष्टी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT