Farmer commits suicide in Warud taluka of Amravati district 
विदर्भ

हृदयद्रावक! लग्नाचे बाशिंग बांधण्यापूर्वीच नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

संतोष ताकपिरे

वरुड (जि. अमरावती) : लग्नाचे बाशिंग बांधण्यापूर्वीच नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सकाळच्या सुमारास तालुक्‍यातील शिंगोरी येथे उघडकीस आली. या घटनेने शिंगोरी गावामध्ये खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नीलेश रामदास कोहळे हा युवक गुरुवारी (ता. १९) सायंकाळच्या सुमारास घरून गेला होता. तो रात्री परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो आढळून आला नाही. काल सकाळच्या सुमारास ममदापूर शेतशिवारातील एका शेतात नरेश पारधेकर यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत नीलेश दिसून आला.

नीलेश कोहळे हा विद्युत सहायक म्हणून कार्यरत होता. पुढील महिन्यात त्याचा विवाह होणार होता. परंतु, विवाहापूर्वी त्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नीलेशच्या वडिलांच्या नावाने सहा एकर शेती होती. ती शेती नीलेश सांभाळत होता. गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे तो चिंताग्रस्त असल्याचे सांगण्यात येते. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

घटनेची माहिती बेनोडा शहीद पोलिसांना दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. काल सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीलेशच्या मागे वडील, भाऊ, बहीण असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

Khadakwasla Dam Water Level : पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत 5.27 टीएमसी पाणी कमी, चारही धरणांत 23.05 टीएमसी साठा शिल्लक

Gokul Government Directors : अखेर 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्तीचा मार्ग मोकळा, मतदानाचाही मिळाला अधिकार

IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

SCROLL FOR NEXT