tiger sakal
विदर्भ

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना

धानाला खत देण्यासाठी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले.

सकाळ वृत्तसेवा

धानाला खत देण्यासाठी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) - धानाला खत देण्यासाठी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी (ता. १६) दुधवाही गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात घडली. मृत शेतकऱ्याचे नाव मुखरू पैकू राऊत (वय ६० रा. दुधवाही) असे आहे.

ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून चार किमी अंतरावर असलेल्या दुधवाही येथील मुखरू राऊत यांचे शेत गावापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलात आहे. त्यांनी शेतात धानपीक लावले होते. धानाला खत देण्यासाठी ते मंगळवारी (ता. १६) सकाळी शेतात गेले. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने त्यांचा मुलगा नरेश हा वडीलांच्या शोधात शेतावर गेला.

तेव्हा वडीलांचा मृतदेह लचके तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्याने गावातील नागरिकांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच गावकरी शेताकडे धाऊन आले. घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलिस कर्मचारीही आले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पदमापुरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी

ब्रह्मपुरी- गावालगत शेळ्या-गायी चराईसाठी घेऊन गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले. ही घटना पदमापुर गावापासून एक किमी अंतरावर मंगळवारी (ता. १६) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. जखमी गुराख्याचे नाव प्रभाकर मडावी (वय ४५ रा. पदमापूर) असे आहे. तालुक्यातील शेवटच्या टोकावर जंगलव्याप्त भागात वसलेल्या पदमापुर येथील प्रभाकर मडावी हे शेळ्या व गायी चराईसाठी जंगलालगत गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा गुराख्याने प्रतिकार करून स्वतःचा जीव वाचवला. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT