farmer doing potatoes farming in korpana of chandrapur  
विदर्भ

शेतकरी मालामाल! लातुरातून घेतली माहिती अन् चंद्रपुरात केला प्रयोग, एकरी ६० ते ७० क्विंटल उत्पन्न

सिद्धार्थ गोसावी

कोरपना (जि. चंद्रपूर) : एकोणवीस एकर शेतात नवनवीन प्रयोग करणाऱ्या बोरी नवेगाव येथील शेतकरी साईनाथ कुंभारे यांनी यावर्षी बटाट्याचे पीक घेतले. उत्तम व्यवस्थापन, कृषी विभागाच्या वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनाने त्यांच्या शेतात चक्क एकरी साठ ते सत्तर क्विंटल बटाट्याचे उत्पादन झाले आहे. प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या प्रयोगाला भरघोस यश संपादन केले आहे. 

तालुक्‍यात आदर्श शेतकऱ्यांचा एक गट आहे. ते आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करतात. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या गटाकडून सुरू आहे. या गटाने आजवर आपल्या शेतात टरबूज, खरबूज, हळद, आले, ऊस, केळी यांसह अन्य पिके घेतली. ते बघून तालुक्‍यातील अन्य शेतकऱ्यांनी असेच प्रयोग आपल्या शेतात केले. तालुक्‍यात कापूस, सोयाबीन, मिरची, गहू हे मुख्य पीक आहे. आता शेतात पिकांच्या नवनवीन प्रयोगाला चालना मिळत असल्याने शेतकरीसुद्धा नवनवीन पिके घेत आहेत. असाच एक प्रयोग तालुक्‍यातील बोरी नवेगाव येथील आदर्श शेतकरी, सोनुर्ली येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक साईनाथ कुंभारे यांनी केला. साईनाथ दरवर्षी आपल्या १९ एकर शेतात नवनवीन प्रयोग करतात. यंदा त्यांनी शेतात टरबूज व खरबुजाची लागवड केली. लातुर जिल्ह्यात शेतकरी बटाट्याचे पीक घेतात. साईनाथ कुंभारे यांनीही शेतात बटाट्याचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्याची त्यांनी संपूर्ण माहिती घेतली. लातूरहून बटाट्याचे बेने त्यांनी आणले. साधारणपणे ऑक्‍टोबरमध्ये त्याची लागवड केली. अवघ्या चार महिन्यांत एकरी ६० ते ७० क्विंटल बटाट्याचे उत्पादन त्यांनी घेतले. 

बटाट्याचे उत्पादन घेण्यासाठी एकरी चाळीस हजार रुपयांचा खर्च त्यांना आला. शेतातील बटाटा साईनाथ कुंभारे मोठ्या हॉटेलमध्ये विकत आहेत. हेच उत्पादन पंधरा दिवस अगोदर निघाले असते तर बटाट्याला चांगला भाव मिळाला असता, असे कुंभारे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT