farmer facing problems because of soybean rice and cotton crop damaged  
विदर्भ

'सोयाबीनसह धानाचे पीक पेटविले, बोंडअळीने कापसाचे नुकसान; सांगा आता कर्ज फेडायचे कसे?'

प्रमोद काकडे

चिमूर (जि. चंद्रपूर ) :  चांगले उत्पन्न व्हावे, यासाठी सावरी(बिड )येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज घेऊन सोयाबीन पेरले. मात्र, रोगाने शेंगाच लागल्या नाही, तर धानावर करपा आला. त्यामुळे सोयाबीन आणि धान दोन्ही पेटवून दिले. कापसावर अखेरची आशा होती. मात्र, कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे झाडे उपटून टाकण्याशिवाय पर्याय उरला नाही. तिन्ही पिके हातचे गेले. आता कर्ज फेडायचे कसे? असा सवाल शेतकरी करत आहे.

मुरलीधर नत्थू रामटेके, असे शेतकऱ्याचे नाव आहे. मुरलीधर यांच्याकडे तीन एकर शेती आहे. ते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतात राबराब राबतत. चांगले पीक येईल, या आशेवर स्वतःजवळची पुंजी, सावकार आणि बँकेकडून कर्ज घेऊन पेरणीपासून तर मशागतीचा खर्च केला. मात्र, निसर्ग व रोगामुळे सर्व आशेवर पाणी फेरले आणि पदरी निराशाच पडली. त्यामुळे शेतातील धान व सोयाबीन पिकाला आग लावली. यामुळे त्यांची संपूर्ण आस कापसावर होती. मात्र, संकट काही त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. कापूस पिकालाही बोंडअळीने घेरले. त्यामुळे कापसाचे पीक उपटून नष्ट करण्याशिवाय पर्याय उरलाच नाही. उत्पन्नाचे सर्व मार्ग खुंटल्याने आता कर्ज कसे फेडायचे, असा सवाल मुरलीधर कृषी विभाग, शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT