farmer got three lakh rupees form sweet lime farming in savner  
विदर्भ

सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून फुलविली मोसंबीची बाग, दोन एकरात वर्षाला तीन लाख उत्पन्न

मनोहर घोळसे

सावनेर (जि. नागपूर): केवळ दोन एकर शेतीत मोसंबी पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे म्हटल्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, हा यशस्वी प्रयोग नंदापूर येथील शेतकऱ्याने पत्नीच्या मदतीने सेंद्रिय शेतीतून यशस्वीपणे करून दाखविला. त्यांना वर्षाला जवळपास तीन लाखांचे उत्पन्न मिळत असून त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

तुळशीदास पाटील, असे मोसंबीचे उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. त्यांनी सुरुवातील पारंपरीक पद्धतीने शेती केली.  शेती करणे परवडत नाही, असे सुरुवातीला त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी तालुक्यातील एका खासगी कंपनीत नोकरी केली. मात्र, त्यांची पत्नी सुनंदाला शेतीकामाविषयी आवड आहे. त्यामुळे परत एकदा शेतीला महत्व देण्यासाठी गावातील प्रगतशील शेतकरी साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून अ‌ॅग्रोवनमधून प्रशिक्षण घेतले. पुढे त्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. त्यानंतर चार एकरपैकी दोन एकरामध्ये मोसंबीची शेती करायचे त्यांनी ठरवले. अशारितीने त्यांची शेतीशी परत नाळ जुळली आणि अवघ्या दोन एकर शेतामध्ये मोसंबीचे भरघोस उत्पन्नही मिळू लागले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती परवडत नाही म्हणून बरेच शेतकरी शेतीपासून दूर जातात व दुसऱ्या व्यवसायाचा शोध घेतात. मात्र, पाटील यांना पत्नी व मुलाची साथ मिळाल्याने सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून मोसंबीची बाग त्यांना फुलवता आली.  

पारंपरीक पद्धतीला फाटा देत फलोत्पादन आणि आधुनिक शेतीकडे वळलेले पाटील कुटुंबीय सातत्याने मोसंबी पीक घेण्यासाठी कृषी विभागातर्फे आयोजित चर्चासत्र परिसंवाद व प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतात. यातून त्यांनी पिकांचे योग्य नियोजन, व्यवस्थापन व नैसर्गिक शेतीचे धडे गिरविल्याचे ते सांगतात. त्यांना मोसंबी पिकाचे जवळपास तीन लाखांचे उत्पन्न मिळत असून इतरही आंतरपिकातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी प्रगती साधली आहे. यंदा त्यांनी आंतरपीक म्हणून पपईची लागवड केली आहे. यातून जवळपास दोन लाखांचे उत्पन्न मिळेल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. नैसर्गिक शेती पिकांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे तुळशीदास पाटील अनुभवातून सांगतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNREGA Strike : 'मनरेगा' कर्मचाऱ्यांचा एल्गार! बेमुदत संपामुळे राज्यातील ग्रामीण विकासकामे पूर्णपणे ठप्प

Karad ZP Election : कराडमध्ये राजकीय वातावरण तापले! बोगस मतदानाच्या संशयावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने, वडगाव हवेलीत हायव्होल्टेज ड्रामा

Ind vs USA T20 World Cup : भारत-अमेरिका सामन्यात मोडले जाऊ शकतात 'हे' विक्रम; अभिषेक-सूर्या इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर...

ZP Elections 2026 Voting Live Update : कोरेगाव भीमामध्ये दोन फूट उंचीच्या मुलीने बजावला मतदानाचा हक्क

Sangli News: दहा ग्राम सोन्यासाठी मोजावे लागतात पन्नास टन उसाचे पैसे; शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नात मंगळसुत्र खरेदी करणेही झाले जिकिरीचे!

SCROLL FOR NEXT