विदर्भ

वीज पडून शेतकरी ठार; यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्‍यात मुसळधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील झिरपुडवाडी परिसरात शनिवारी (ता. २९) सायंकाळी वादळी पाऊस (Heavy rain) झाला. दरम्यान शेतात काम करणारा एक शेतकरी पावसापासून बचावासाठी बैलासह झाडाखाली उभा होता. झाडावर वीज कोसळल्याने (Lightning struck the tree) शेतकरी बैलासह ठार (Farmers killed) झाला. बबन तुळशीराम नाटकर (वय ४५, रा. झिरपुरवाड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (Farmer-killed-in-lightning-strike-in-Digras-taluka-of-Yavatmal-district)

बबन हे दोन बैलांसह मुंगशीराम आंबोरे यांच्या शेतातील मोहाच्या झाडाखाली पावसापासून बचावासाठी उभे होते. याच वेळी जोरदार विजेचा कडकडाट झाला. त्यामुळे एक बैल पळत सुटला. काही सेकंदात मोहाच्या झाडावर वीज कोसळली. यामध्ये बबन नाटकर व बैलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती सरपंच पुरुषोत्तम कुडवे यांनी पोलिसांना दिली. एपीआय धीरेंद्रसिंह बिलवाल, सुभाष चिरमाडेसह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांना सोपविण्यात आला. दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

याच दिवशी सायंकाळी डेहणी येथे मुसळधार पाऊस झाला. पुंडलिक मोखाडे यांच्या घरासमोरील वडाचे मोठे झाड कोसळले. यामध्ये गंगा पुंडलिक मोखाडे (वय ३५), अंकुश मोखाडे (वय ६) व दयानंद शंकर मोखाडे (वय ८) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नुकसानाचा पंचनामा करून संबंधितांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी दिग्रस तहसीलदार राजेश वझीरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे.

शासनाने त्वरित मदत करावी

झिरपूरवाडी येथील मृत शेतकरी बबन नाटकर हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे ४ एकर शेती होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबातील सदस्यांवर मोठे संकट कोसळले आहे. या शेतकरी कुटुंबाला मदतीची गरज आहे.

(Farmer-killed-in-lightning-strike-in-Digras-taluka-of-Yavatmal-district)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cut Outs Removed: शिवाजी पार्क परिसरातील मोदी-शहांचे कटआऊट्स हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई

CSEET Result : ICSI कडून CSEET 2024 चा निकाल जाहीर; 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करुन स्कोअरकार्ड डाऊनलोड करा

Share Market Closing: निफ्टी 22400 पार.. चढ-उतारानंतर शेअर मार्केट वाढीसह बंद, जाणून घ्या कशी आहे शेअर्सची स्थिती!

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : आरटीई प्रवेशासाठी उद्यापासून अर्ज भरता येणार

SCROLL FOR NEXT