file photo
file photo 
विदर्भ

शेतकऱ्याने संत्राबागेऐवजी दिले मशिदीला पाणी

सकाळ वृत्तसेवा

चांदूररेल्वे, (जि. अमरावती) : दुष्काळाच्या स्थितीत संत्राझांडाना वाचविण्यासाठी तालुक्‍यातील शेतकरी धडपड करीत आहेत. असे असताना येथील एका शेतकऱ्याने आपल्या संत्राझाडांना पाणी न देता रमजान महिन्यात मशिदीत येणाऱ्यांची तहान भागविली. पळसखेड येथील या घटनेने हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे उदाहरण पुढे आले आहे.
अनेक दिवसांपासून या परिसरात प्रचंड पाणीटंचाई आहे. गावातील अनेक बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. रमझान महिन्यामध्ये गावातील मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी मशिदीमध्ये जातात. मशिदीमधील बोअरवेलसुद्धा आटल्याने तेथे येणाऱ्या मुस्लिम बांधवांची तहान भागविण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत गावातील प्रकाशराव अलोणे यांनी आपल्या बोअरवेलचे पाणी मयिदीला देण्याचा निर्णय घेतला. आपल्या शेतातील संत्राझाडांना पाणी न देता त्यांनी मशिदीला पाणी दिले. रमझान या पवित्र महिन्यात त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. विशेष म्हणजे, ईदच्या दिवशी सर्व मुस्लिम बांधवांकडून त्यांचे आभार मानण्यात आले. पळसखेडच्या मशीद कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शहजाद खां, गुलफराज खा, मोसिब खान ऊफ बाबा खान, मोहसीन खान, सलमान खान, सय्यद तौसिफ, शाहरुख मिस्त्री, इरफान खा, फैय्याजुद्दीदिन, शेख शारिक, शमशीर पठाण, बबलू पठाण, सोनू पठाण, नियामत अली, अनवर खा, शमीम कुरेशी, शेख इम्मु, शेख आसिफ यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT