मारेगाव : शेतातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्‍टर फिरविताना शेतकरी.  
विदर्भ

सततच्या पावसामुळे सोयाबीनला शेंगा फुटल्याच नाही, मग निराश शेतकऱ्याने पिकात फिरवला ट्रॅक्टर

सुमीत हेपट

मारेगाव (जि. यवतमाळ) : सततच्या पावसाने शेतकऱ्याच्या पाचही एकरातील सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.


त्यामुळे तालुक्‍यातील बोरी (गदाजी) येथील निराश झालेल्या संभाजी डोमाजी बेंडे या शेतकऱ्याने पाच एकरातील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्‍टर फिरवून घामाने पिकविलेल्या पिकाला उद्ध्वस्त केले.

पिकांचे प्रचंड नुकसान
 

यंदा मारेगाव तालुक्‍यात झालेल्या सततच्या पावसाने कापूस व सोयाबीन या सर्वाधिक लावगड क्षेत्र असलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोरी (गदाजी) येथील संभाजी बेंडे यांच्या पाच एकरात सोयाबीन पीक होते.

सोयाबीनला फुटले कोंब

मात्र, यावर्षी परतीच्या पावसाने तालुक्‍यात जोरदार व सातत्यपूर्ण हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन पिकाला कोंब फुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले. निराशा व संतापाच्या भरात या शेतकऱ्याने शेतात उभ्या पिकावर ट्रॅक्‍टर फिरवून ते नष्ट केले.

मनावर दगड ठेवला
पाच एकरात सोयाबीन पेरले होते. मात्र अति पावसामुळे शेंगा भरल्याच नव्हत्या. त्यामुळे मनावर दगड ठेवून पिकावर ट्रॅक्‍टर फिरविला. शासनाने नुकसानभरपाई द्यावी. आता रब्बी हंगामाची तयारी करतो आहे. बघतो यातून तरी काही फायदा होतो की नाही.
- संभाजी बेंडे, शेतकरी.

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

Baba Vanga Prediction : निम्मा जून उलटूनही पाऊस नाही! 2026 बद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतीये का? नेमकं काय म्हटले होते?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

SCROLL FOR NEXT