halad final 
विदर्भ

Video : जीवन चलने का नाम! शेतकरी कुटुंब रंगले हळदी विक्रीच्या रंगात

सकाळ वृत्तसेवा

दारव्हा (जि. यवतमाळ) : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्‍यात असलेल्या महागाव कसबा येथील प्रकाश दुधे या शेतकऱ्याने परिस्थितीवर मात करत चक्क शेतात पिकविलेल्या हळदीची पावडर विकून आयुष्यात ' प्रकाशवाट ' निर्माण केली आहे. शेतकरी प्रकाश दुधे यांनी पारंपारिक पिकासोबत प्रथमच हळदीची लागवड केली.

त्यांचेकडे एकूण सहा एकर शेती. त्यापैकी अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी हळदीचा प्रयोग केला. प्रचंड कष्ट घेतले. काळजी घेतली. शिवारात हळद बहरली. चांगले उत्पादन झाले. एकोणवीस क्विंटल हळद झाली. घरातील अंगणात हळद वाळू घातली. बाजार पेठेत विक्री करून चांगला भाव मिळेल, अशी आशा निर्माण झाली. मात्र त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. हिरमोड झाला. त्यांचा उत्साहच ' लॉकडाऊन ' झाला.



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ ठप्प झाली. घाम गाळून पिकविलेल्या हळदीचे काय होईल, या विचाराने चिंताग्रस्त झाले. विविध समस्या उभ्या ठाकल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सतावत होता. थांबायचं तरी किती दिवस ? अखेर कौटुंबिक चर्चेतून ' प्रकाशवाट ' सापडली. हळदीची पावडर तयार करून विक्री करण्याचा संकल्प प्रकाश दुधे यांनी केला.

सर्वप्रथम एक क्विंटल हळदीची दगडी खलबत्यामध्ये घरीच बारीक कांडणी केली. चक्कीवर पावडर काढली. संपूर्ण कुटुंब हळदीमध्ये रंगून गेले. शुद्ध अस्सल हळद पावडर पाकिटात पॅक केली आणि महागाव परिसरातील खेड्यांमध्ये दुचाकीने प्रवास करीत चक्क हळदीची विक्री केली.

सविस्तर वाचा - का केली आयुक्‍त मुंढेविरुद्ध महापौर जोशींनी पोलिसात तक्रार? वाचा

सोशल डीस्टन्सिंगचे पालन करीत गावोगावी फिरले. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रकाश दुधे यांनी लॉकडाऊनमधील समस्यांवर मात केली. शेतात स्वतः कष्टाने पिकविलेल्या हळदीचे मार्केटिंग करतांना त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. चांगला आर्थिक लाभ झाला. चालू हंगामात हळद लागवड क्षेत्र वाढविणार असल्याचे प्रकाश सांगतात. भविष्यात नियोजपूर्वक हळद पावडर विक्रीचा गृहउद्योग उभारण्याचा त्यांचा मानस आहे. संकटकाळात एका शेतकऱ्याच्या जिद्दीची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे..!  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT