ecommerce.jpg 
विदर्भ

काय म्हणता? आपत्तीचे रुपांतर केले इष्टापत्तीत! वाचा कसे....

सकाळ वृत्तसेवा

अकोला : टाळेबंदीच्या या काळात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनामार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रशासनाला यश सुद्धा मिळताना दिसत आहे. परंतु याच काळात कृषी विभागाने ‘शेतकरी ते ग्राहक’ साखळी तयार करुन शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे इतर जिल्ह्यांमध्ये बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा माल रस्त्यावर फेकून दिला. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टाळेबंदीतच 7 कोटी 71 लाख रुपयांचा भाजीपाल्याची विक्री करुन या आपत्तीचे रुपांतर इष्टापत्तीत केले आहे. 

टाळेबंदीच्या या काळात शहरी नागरिकांना चांगला, ताजा भाजीपाला स्वस्त आणि घरपोच देण्याची सुविधा कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर आपला माल विक्रीसाठी पाठवला आहे. जिल्ह्यात आजमितीला 69 शेतकरी गट भाजीपाला उत्पादन करत आहेत. या शेतकरी गटांना जिल्ह्यात विशेषतः नागरी भागात 93 ठिकाणी थेट विक्री केंद्र सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. या शेतकऱ्यांनी तब्बल 514 मेट्रिक टन इतका भाजीपाला व फळे इत्यादी शेतीमाल टाळेबंदीच्या काळात विक्री केला आहे. या मालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी 7 कोटी 71 लाख रुपयांची उलाढाल सुद्धा केली आहे.

शेतकऱ्यांनी अशी केली मालाची विक्री
अकोला तालुक्यातील 53 गटांनी 26 विक्री केंद्रांमधून 92.20 मेट्रिक टन माल विक्री केला. मुर्तिजापूर  - 41 गटांनी 10 केंद्रांमधून 78.50 मेट्रिक टन माल विक्री केला. बार्शीटाकळी - 43 गटांनी 14 विक्री केंद्रांमधून 63.20 मेट्रिक टन माल विक्री केला. अकोट - 37 गट 15 विक्रीकेंद्रांमधून 75.60 मेट्रिक टन मालाची विक्री केली. तेल्हारा  -36 गटांनी 14 केंद्रांवर 69.75 ट्रिक टन माल विक्री केला. पातूर  - 40 गटांनी 11 विक्री केंद्रावर 69.60 मेट्रिक टन माल विक्री केला. बाळापूर - 38 गटांनी 14 द्रांवर 64.85 मेट्रिक टन मालाची विक्री केली.

अशी काम करते साखळी
शेतकऱ्यांनी विक्री केंद्रामार्फत मोबाईल वर ऑर्डर मागविण्यास सुरुवात केली. त्यावर प्राप्त ऑर्डरनुसार मालाचे पॅकिंग करुन ग्राहकांना घरपोच माल दिला जातो. तसेच गावात वा शहरातही मोक्याच्या जागी हे शेतकरी आपला माल घेऊन उभे राहतात. तेथे रितसर माल मोजून ग्राहकांना माल दिला जातो. याचे दर अत्यंत कमी असतात. बाजारभावापेक्षा तरी खूपच कमी. शेतकरी ते ग्राहक साखळीमुळे व्यापारी, आडते, वाहतूकदार यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे वाहतूक होते ती थेट ग्राहकापर्यंत. साखळीतील अन्य घटक कमी झाल्याने भाव परवडतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT