fertilizer
fertilizer  
विदर्भ

Farmer : खतांसाठी शेतकऱ्यांवर MRPपेक्षा मोजावे लागणार अधिक पैसे, कारण...

कृष्णा लोखंडे

अमरावती : यावर्षीही चांदूरबाजार येथील रॅक उपलब्ध होणार नसल्याने खताचे वितरण बडनेरा व धामणगावरेल्वे येथीलच रॅक पॉइंटवरून करावे लागणार आहे. खतांच्या किमतीत वाढ झाली नसली तरी विक्रेते वाहतूक खर्च शेतकऱ्यांकडून वसूल करणार असल्याने शेतकऱ्यांना एमआरपीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान ४५ हजार ४७ मेट्रिक टन साठा सध्या उपलब्ध असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्ह्यातील चौदा तालुक्यात खत वितरणासाठी बडनेरा व धामणगावरेल्वे येथे रॅक पॉइंट आहेत. चांदूरबाजार येथे नवीन रॅक पॉइंट तयार करण्याचे प्रस्तावित होते. मात्र रेल्वे विभागाकडून गोदाम उभारण्यात आलेले नसल्याने रॅक तयार होऊ शकलेली नाही. कृषी अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या डीआरएमसोबत त्यासाठी संपर्क केल्यानंतरही हंगाम तोंडावर आला असताना तयार करण्यात आलेले नाही.

त्यामुळे यावर्षी या रॅक पॉइंटहून वितरणाची शक्यता मावळली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या रॅकसाठी जिल्हा नियोजनमधून निधी घेण्याची मुभा दिली आहे. मात्र हा पैसा रेल्वेविभागाकडे वर्ग करावा लागणार आहे. रेल्वेविभाग मात्र त्यासाठी उदासीन आहे.

दरम्यान, बडनेरा व धामणगावरेल्वे येथून वितरणासाठी विक्रेते वाहतूक खर्च शेतकऱ्यांकडून वसूल करीत असल्याने त्यांना एमआरपीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

१ लाख १४ हजार मेट्रिक टन खतांचे आवंटन

जिल्हा कृषी कार्यालयाकडून दरवर्षी संभाव्य मागणी लक्षात घेऊन नियोजन करण्यात येते. वर्ष २०२२ मध्ये १ लाख १० हजार ९३ मेट्रिक टन खतांचा वापर केल्या गेला, तर वर्ष २०२३ साठी १ लाख ६० हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली. त्यापैकी १ लाख १४ हजार ३१० मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले. ३१ मार्च २०२३ अखेर रब्बी हंगाम २०२२-२३ मधील ३३ हजार ११० मेट्रिक टन खते शिल्लक असून २० एप्रिलपर्यंत ११,९३७ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे.

मागणीनुसार पुरवठा

जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांसाठी खतांचे आवंटन निश्चित झाले आहे. उपलब्ध साठा बघता मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो. यंदा खतांची टंचाई नाही. शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार खरेदी करावी. जिल्ह्यात १ लाख १४ हजार ३१० मेट्रिक टन खतांचे आवंटन होणार आहे.

-राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT