farmer turned tractor on cotton in 2 acre farms 
विदर्भ

गुलाबी बोंडअळीमुळे शेतकरी त्रस्त, दोन एकरातील कापसावर फिरविला ट्रॅक्टर

आनंद चलाख

राजुरा (जि. चंद्रपूर): कापसाच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने २ एकरातील कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. गुलाबी बोंड अळीमुळे शेतकऱ्याला नाइलाजाने कपाशीचे पीक काढावे लागले. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

राजुरा तालुक्यातील कोहपरा येथील शेतकरी नितीन श्रीकृष्ण पिंगे यांनी आपल्या शेतात दोन एकरामध्ये कापसाच्या पिकाची लागवड केली होती. कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक असल्याने  राजुरा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. मात्र, ऐन कापूस काढण्याच्या वेळी कापसावर गुलाबी बोंडअळी व बोंडसड आल्याने शेतकरी हताश झाले आहेत. त्यामुळे कापसाचे पीकच ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून टाकले. एकीकडे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान केले. आता दुसरीकडे हाती येणारे पीक डोळ्यांदेखत गुलाबी बोंड अळीमुळे उद्धवस्त झाले आहे. खरीप हंगामातील कापूस पिकावर शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. आता कापूस काढण्याचा काळ आला असतानाच अचानक कापूस पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. खर्चही भरून निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्याने कापूस पिकावर अतोनात खर्च केला होता. 

दिवाळीच्या तोंडावर आर्थिक चणचण -
दिवाळी ऐन तोंडावर आली आहे. सणासुदीचे दिवस आनंदात जावे, असे वाटत असतानाच कापसाच्या पिकांवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने कापसाच्या पिकांवर ट्रॅक्टर फिरविला. बोंड अळीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे. राजुरा तालुक्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने कापसाचे नुकसान झाले आहे.

दोन एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. सुरुवातीपासून पिकांवर अतोनात खर्च केला होता. मात्र, कापसावर अचानक गुलाबी बोंडअळी व बोंडसडचा प्रादुर्भाव झाल्याने २ एकरातील कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक काढून टाकले आहे. बोंडअळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
-नितीन पिंगे, नुकसानग्रस्त शेतकरी, कोहपरा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT