Farmer was swept away in flood of Nala 
विदर्भ

नाल्याच्या पुरात शेतकरी वाहून गेला

शोधमोहीम सुरू; शेतात जात असताना घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) - नाल्याला आलेल्या पुरातून शेताकडे जाण्याचा प्रयत्न करताना तालुक्यातील नोकारी बु. येथील संजय राजाराम कंडलेवार (वय ५०) हे वाहून गेले. ही घटना रविवारी (ता. १०) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर शोधमोहीम राबविण्यात आली. परंतु, वृत्त लिहीपर्यंत ते आढळून आले नाही.

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. तर, काही नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील नोकारी बु. (माइन्स) येथील नाल्याच्या पलीकडे संजय कंडलेवार यांची शेती आहे. आज सकाळच्या सुमारास ते शेतीकडे जाण्यासाठी निघाले. शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यातील नाल्याला पूर आला आहे. पुलावरून पाणी जात असताना ते शेतीकडे जाऊ लागले. यावेळी पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नाल्याच्या दोन्ही बाजूंनी अमलनाला धरणापर्यंत नामदेव देठे, मारोती पिलावान, माजी उपसरपंच वामन तुराणकर, पोलिस पाटील राकेश भगत यांच्यासह गावकऱ्यांनी शोध घेतला; मात्र ते कुठेच आढळून आले नाही.

दुचाकी धुताना वीज कर्मचारी बुडाला

गडचिरोली : नाल्याच्या पाण्यात चिखलाने माखलेली दुचाकी धुवत असताना पाण्याचा प्रवाह वाढून एका वीज कर्मचाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवार सायंकाळी अहेरी तालुक्यातील पेरमिली नाल्यावर घडली. जितेंद्र दोडके (वय ४०) असे मृताचे नाव असून, तो चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मुरपार येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दोडके हे वीज वितरण केंद्र भामरागड येथे लाइनमन म्हणून कार्यरत होते. ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच प्रशासनाच्या साहाय्याने शोधमोहीम राबविली असता वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला. जितेंद्र दोडके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

MSRTC: सर्व एसटी बसचे रूपांतर ई-बसमध्ये होणार, महामंडळ २०० चार्जिंग स्टेशन उभारणार, परिवहनमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : गावठी दारू अड्ड्यावर धाड; 4 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

NEET Paper Leak Controversy : NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत; नाशिकचा 30 वर्षीय BAMS विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात, क्राईम ब्रँचने असा रचला सापळा

SCROLL FOR NEXT