farmers agitation in mahagaon of yavatmal 
विदर्भ

महागावात शेतकऱ्यांचा रास्तारोको, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

राजकुमार भितकर

महागाव (जि. यवतमाळ) : सरकारने शेतकरीविरोधी काळे कायदे करून शेती व्यवस्था कार्पोरेट लॉबीच्या दावणीला बांधण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप आहे.  हे काळे कायदे मागे घेण्यासाठी मागील 70 दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी (ता.6) महागाव बसस्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला. शेतकर्‍यांनी तासभर रस्ता अडवून धरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांनाही मनःस्ताप सहन करावा लागला. राष्ट्रीय किसान मोर्चा, किसान युवा क्रांती संघटना, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा आदी संघटना यात सहभागी झाल्या होत्या. नागोराव पाटील कदम, मनीष जाधव, प्रमोद जाधव, किशोर नगारे, आशीष गावंडे, अमोल गावंडे, सलिम भाई, अमोल आवटे, रियाज पारेख, सागर डोगरे, अविनाश राठोड, अ‍ॅड. पवन धरणकर व शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT