farmers agitation for not getting government help in amravati 
विदर्भ

संत्री फुकट घ्या फुकट; शासनाकडून मदत न मिळाल्याने शेतकरी संतप्त

सुधीर भारती

अमरावती : संत्र्याला अतिशय कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामुळे मोर्शी व वरुड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.14) जिल्हाधिकारी कार्यालयामोर नागरिकांना फुकटात संत्र्यांचे वाटप केले. 

माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. डॉ. बोंडे यांनी सांगितले, की जिल्ह्यात संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात  करण्यात येते. परंतु, यावर्षी अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु, तरीसुद्धा संत्रा उत्पादकांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या अचडणींना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप डॉ. बोंडे यांनी केला.

शेतकरी संकटात असताना महाविकास आघाडी सरकार मात्र राजकारण करण्यात दंग आहे, असा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांना प्रती हेक्‍टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तत्पूर्वी भाजपचे शहराध्यक्ष किरण पातूरकर, ललित समदूरकर, मिलींद बाबल, राजेश आखेगावकर आदींसह कार्यकर्त्यांनी  जिल्हाकचेरीसमोरील रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटोरिक्षा, एसटी बसेस तसेच पादचाऱ्यांना मोफत संत्री वाटली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT