rainr
rainr 
विदर्भ

जून संपला ! आता प्रतीक्षा पावसाची, यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 103 मिमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : यंदा पाऊस भरपूर असल्याचे हवामान खात्याचे अंदाज आहेत. मॉन्सूनही अगदी वेळेवर आला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, पण अजून पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांची पेरणी वाया जाईल आणि त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येईल, त्यामुळे शेतकरी डोळ्यात प्राण आणून पावसाच्या वाटेकडे डोळे लाऊन बसले आहेत. अंदाजाप्रमाणे मॉन्सूनने देश व्यापला असला तरी जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जून महिना संपला तरीदेखील जिल्ह्यात केवळ 103 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याभरात कमीअधिक प्रमाणात पावसाची उघडझाप सुरू आहे.

जिल्ह्याची वार्षिक सरासरी 163.90 मिमी आहे. यंदा सुरुवातीला मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाची उघडझाप सुरू आहे. जिल्ह्यातून पाऊस गायब झाला नसला तरी कमीअधिक प्रमाणात वेगवेगळ्या भागांत पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांना गरजेनुसार पाणी मिळत आहे. जून महिन्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसात लाख हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. सध्या पिकांना आवश्‍यकतेनुसार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांची स्थिती बरी आहे. जिल्ह्यात 30 जूनपर्यंत 104.02 मिमि पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 159.89 मिमि पाऊस नेर तालुक्‍यात झाला आहे. राळेगाव तालुक्‍यात सर्वांत कमी 81 मिमि पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या परिसरात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय पर्जन्यमान
यवतमाळ तालुक्‍यात 92.77, बाभूळगाव 106.19, कळंब 121.52, दारव्हा 91.12, दिग्रस 95.26, आर्णी 135.99, नेर 159.89, पुसद 115.65, उमरखेड 93.18, महागाव 108.29, वणी 97.77, मारेगाव 87.15, झरी जामणी 147.58, केळापूर 98.92, घाटंजी 116.99, तर राळेगाव तालुक्‍यात 81 मिमि पावसाची नोंद झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT