crime sakal
विदर्भ

सावकारी प्रकरणात शेतकऱ्याचे फोडले डोके

तब्बल वर्षभरानंतर गुन्हा केला दाखल, पोलिस तपास सुरू

सकाळ वृत्तसेवा

देऊळगावराजा : सावकारी प्रकरणाचे व्हिडिओ शूटिंग काढलेल्या मोबाईल मधील पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्यात सावकारग्रस्त युवक शेतकरी गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात तब्बल वर्षभरानंतर नुकतेच १६ जानेवारीला पोलिसांनी संबंधितांविरुद्ध मारहाण करून लुटल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पांगरी येथील शंकर कोंडिबा वाघ यांनी गणेश बाबूराव वाघमारे यांच्याकडून व्याजापोटी काही पैसे घेऊन जमीन खरेदी खतद्वारे गव्हाण दिली होती. व्याजासहित पैसे परत देऊनही सदर जमीन परत देत नसल्याने शंकर वाघ यांनी संबंधित सावकाराविरुद्ध जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अवैद्य सावकारी संदर्भात तक्रार दाखल केली होती व सुनावणीदरम्यान शेतकर्‍याने मोबाईलद्वारे संबंधित सावकार याच्याशी झालेल्या संभाषणाची चित्रफित पुरावा म्हणून सादर केली होती.

यावरून २९ जानेवारीला शंकर वाघ यांचा मुलगा विकास शंकर वाघ हा बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीत थकीत कर्जाची रक्कम तीस हजार रुपये भरण्यासाठी पांगरी येथून देऊळगाव राजाकडे येत असताना महानमा लॉन्स जवळ दुचाकीस्वार गजानन बाबूराव वाघमारे राहणार सिनगाव जहागीर व नामदेव शिवराम वाघ दोघांनी सोबत आणलेल्या लोखंडी रॉडने विकास वाघ यास डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले व खिशातील रोख तीस हजार रुपये व मोबाईल काढून घेतले.

यावेळी नामदेव वाघ म्हणाला गणेश वाघमारे विरोधात टाकलेली सावकारीची तक्रार मागे घे नाहीतर तुला जीवे मारून टाकू अशा आशयाची फिर्याद गंभीर जखमी विकास शंकर यांनी पोलिसात दिली होती. यासंदर्भात तब्बल एक वर्षानंतर पोलिसांनी गजानन बाबूराव वाघमारे राहणार सिनगाव जहागीर व नामदेव शिवराम वाघ राहणार पांगरी माळी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. याबाबत ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक डीएम वाघमारे प्रकरणाचा तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT