Farmers in the fields overnight for irrigation fear of attack by wildlife 
विदर्भ

रक्त गोठवणाऱ्या थंडीत करावं लागतं जागरण, वन्यप्राण्यांकडून हल्ल्याची भीती

सूरज पाटील

यवतमाळ : खरीप हंगामाने शेतकऱ्यांना पुरता दगा दिला. लागवडीचा केलेला खर्चही निघाला नाही. नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आणि गहू, हरभरा पिकांची पेरणी केली. पीक वाढत असताना सिंचनासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. त्यातच वन्यप्राण्यांकडून हल्ला होण्याची भीतीही सतावत आहे.

यंदा पाऊस चांगला झाल्याने विहिरी, नदी, नाल्यांना पाणी आहे. पाण्याची उपलब्धता बघून शेतकरी नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाकडे वळलेत. कृषी विभागानेही दोन लाख हेक्‍टरवर रब्बी लागवडीचे नियोजन केले. आतापर्यंत पन्नास टक्के क्षेत्रावर गहू व हरभराची पेरणी झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्री जागली करीत सिंचन करावे लागत आहे. 

रात्री सर्व जण झोपले असताना अन्नदाता कुडकुडत्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढत असल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळते. सिंचन करताना शेतकऱ्यांसमोर अनेक धोकेही आहेत. साप, विंचू, वन्यप्राण्यांकडून हल्ला होण्याची भीती सतत सतावत राहते. सिंचनासाठी दिवसा योग्य दाबाची वीज मिळत नाही. त्यामुळे थंडीत रात्र जागरण करीत  पिकांना पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खरीप हंगामात कपाशीचे बोंडअळी, बोंडसडमुळे अतोनात नुकसान झाले. 

परिणामी अनेक शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांवर ट्रॅक्‍टर फिरविला आणि रब्बीची पेरणी केली. मात्र, महावितरण कंपनीकडून मिळणाऱ्या चक्राकार पद्धतीच्या वीजपुरवठ्यामुळे रात्री बारानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतात जावे लागत आहे. घरातील सदस्य झोपेत असताना कुणाचा मुलगा, वडील, कुटुंबातील प्रमुख व्यक्ती शेतशिवार गाठतात. त्यामुळे घरातील वृद्ध मंडळींची झोपही चिंतेने हरविली जाते. दिवसा योग्य दाबाची वीज मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र, अजून कुणीही दखल घेतली नाही, ही खंत शेतकऱ्यांना आहे.

 
अडचणींचा डोंगर

चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला जात असल्याने दिवसा कमी दाबाची वीज मिळते. लाइन ट्रीप होत असल्याने कृषिपंप काम करीत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यास सुरळीत होत नाही. रात्री सिंचन करताना ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट होणे, बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे जिवावर बेतू शकते.
 

मजूरही मिळेना

रात्रीच्या सिंचनासाठी मजूर मिळत नाहीत. वन्यप्राण्यांचा धोका शेतशिवारात राहत असल्याने अल्पमोबदल्यासाठी मजूर आपला जीव धोक्‍यात टाकत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना स्वत: पीक जगविण्यासाठी रात्री सिंचन करावे लागत आहे.


सोशल मीडियातून आर्त विनवणी

शेतातील विहिरीला पाणी असले तरी वीज महावितरण कंपनीकडून नियमित वीजपुरवठा सुरळीत सुरू राहत नाही. पीक जगविण्यासाठी जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना रात्रीचे सिंचन करावे लागत आहे. फक्त 12 तास वीजपुरवठा देण्यात यावा, अशी आर्त विनवणी दिग्रस तालुक्‍यातील मांडवा येथील शेतकरी अशोक गादेवार यांनी सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 
घराघरांतील वास्तव

साहेब, रात्री घरातून बाहेर निघालो, तर आई म्हणते भाऊ बुट घातले का, बायको टॉर्च देते. वडील म्हणतात काठी घेतली का? मी येतो तुझ्या बरोबर. रात्री साप, विंचू, बिबट्यासारखे संकटे असतात. शेतात अंधारात असताना कुटुंबातील सदस्यांना झोप लागत नाही, असे वास्तव चित्र घराघरांत बघावयास मिळते.

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT