विदर्भ

सरपंचांनी घरावर फुलविली भाजीपाला शेती; जोपासला शेतीचा छंद

सकाळ वृत्तसेवा

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : कोणाला इच्छा असूनही दैनंदिन व्यस्ततेमुळे शेती कसता येत नाही. त्यामुळे यावर काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करून अनेकजण आपला छंद जोपासत असतात. असाच छंद खडकीचे सरपंच कृष्णाभाऊ ठलाल यांनी जोपासला आहे. दैनंदिन व्यस्ततेतून मार्ग काढत त्यांनी घराच्या छतावर भाजीपाला शेती केली. त्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी काैतुक केले आहे.

सरपंच कृष्णाभाऊ ठलाल हे दैनंदिन जीवनात फार व्यस्त असतात. सरपंचपदाचा कार्यभार सांभाळताना ते सामाजिक कार्यही करतात. त्यामुळे त्यांचे शेतीकडे जास्त लक्ष नसते. परंतु, शेती करण्याची इच्छा तसेच शेतीबाबत असलेला छंद त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मागील काही वर्षांपासून घराजवळ असलेल्या परसबागेत त्यांनी आपला छंद जोपासला. मात्र, त्या जागेवर सध्या बांधकाम झाल्यामुळे ती संधीसुद्धा हातून गेली.

त्यांनी थेट कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा मार्ग निवडला व कृषी सहायक राजशेखर राणे यांना परिस्थिती सांगितली. त्यावर राजशेखर राणे यांनी सरपंच ठलाल यांना घराच्या छतावर परसबाग तयार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सिमेंटच्या निकामी झालेल्या पिशव्यांमध्ये खत व माती मिश्रण करून त्यामध्ये भाजीपाला, बियाणे, पेरणीविषयी त्यांना सांगण्यात आले.

सरपंच ठलाल यांनी घरावर फुलबाग फुलविली. त्यांनी लवकरच आधुनिक पद्धतीने घरावर ग्रीन हाऊस तयार करण्याची तयारीसुद्धा केली आहे. सरपंच कृष्णाभाऊ ठलाल यांनी कृषी विभागाचे तसेच कृषी सहायक राजशेखर राणे यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय कॅबिनेट बैठकीला सुरुवात, पेपरफुटी प्रकरणावर चर्चा होणार?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT