seeds 
विदर्भ

शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तू मिळतील थेट बांधावर... असे आहे नियोजन

सकाळवृत्तसेवा

अमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी गर्दी टाळण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगामात कृषी निविष्ठा थेट बांधावर पोहोचविण्याचे नियोजन आहे. कृषी सेवाकेंद्राच्या सहकार्याने कृषी विभागाने समन्वयकाची भूमिका बजावून ही प्रक्रिया गतीने राबवावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले. 

जिल्ह्यातील खरीपपूर्व तयारीचा आढावा, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही, कापूस, तूर, हरभरा खरेदी आदी विविध विषयांवर बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चव्हाळे, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्यासह विविध कृषी सेवाकेंद्रचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून खरीपपूर्व तयारीचा आढावा
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, की कृषी निविष्ठा बांधावर पोहोचविण्यासाठी विविध गट, आत्मा, कृषी सेवाकेंद्रे यांना उपक्रमात सहभागी करून घ्यावे. शेतकरी बांधवांकडून कुठेही अतिरिक्त दर आकारला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसा प्रकार होत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. कापूस, तूर, हरभरा खरेदीबाबतही या वेळी चर्चा झाली. 

पीक खरेदीची प्रक्रिया गतीने राबवावी. नियोजनानुसार खरेदी झाली पाहिजे. त्यादृष्टीने सीसीआय, पणन महासंघ यांनी प्रयत्न करावे. कोरोना संकटकाळ लक्षात घेता अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मात्र, त्याशिवाय ही कामे पूर्णत्वास जाऊ शकणार नाहीत, हे लक्षात ठेवून काम करावे.


कीटकनाशकांच्या विक्रीबाबतचा फॉर्म क्‍लिष्ट असल्याने देयक तयार व्हायला वेळ लागतो व खरेदी प्रक्रिया मंदावते, अशा तक्रारी कृषी केंद्रचालकांनी केल्या. त्याबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी बैठकीत कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश दिले. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्‍यक ती सर्व कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray and Eknath Shinde : आजचे वैरी उद्याचे मित्र!, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची सेना कोकणात आली एकत्र; राणे बंधुंची भूमिका काय?

Laxman Hake : हा थिल्लरपणा... जरांगे केवळ सनसानाटी निर्माण करतात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप!

Belagav Farmers Protest : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन; दगडफेकीत सहा पोलिसांसह अनेक जण गंभीर जखमी

अखेर बावनकुळेंच्या खात्याला जाग; फक्त ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरणाऱ्या पार्थ पवारांच्या कंपनीला ४२ कोटींची नोटीस

Latest Marathi News Live Update : मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

SCROLL FOR NEXT