file photo
file photo 
विदर्भ

बोगस बियाण्यांनी शेतकरी अडचणीत 

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : शेतकऱ्यांनी पदरमोड करत विकत घेतलेले धानाचे बियाणे बोगस निघत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. जून महिन्यात रोवणी झालेल्या धानाला आता ओफळ ओंब्या लागत आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. 
भंडारा हा प्रमुख धानउत्पादक जिल्हा आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी विविध केंद्रातून धानबीज विकत घेतले. पऱ्हे टाकून लागवड केली. एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च केला. यात अनेकजण कर्जबाजारी झाले. मात्र, धानपीक चांगले येईल, कर्ज फिटेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु, आता धान निसवण्याच्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. निसवण्याच्या वेळी धान तिसर, चौसर निसवत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 
विनोद भोपे या शेतकऱ्याने एका कंपनीचे बियाणे विकत घेतले. ते बियाणे बोगस निघाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. परंतु, अद्यापही कोणतीही कारवाई झाली नाही. पांजरा येथील शेतकरी सुरेश रामटेके यांनी विकत घेतलेले बियाणेही असेच बोगस निघाले. देवधान सहा एकरांत कसा तयार झाला याची तक्रार मोहाडी कृषी अधिकाऱ्यांकडे केली. नेरी येथील शेतकरी अख्तरबेग मिर्झा यांच्या शेतातसुद्धा बनावट धान उगवले. खमाटा येथील अनेक शेतकऱ्यांनाही असाच अनुभव आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु, कृषी कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांनाच दोष देत आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊनही कृषी विभाग कोणतीच कारवाई करीत नसल्याने शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, अख्तरबेग मिर्झा, विनोद भोपे, सुरेश रामटेके, प्रमोद एंलजवार, ज्ञानेश्वर निकुरे आदी उपस्थित होते. बोगस धान विकणाऱ्या कंपनी आणि कृषी केंद्रावर कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT