विदर्भ

पन्नास हजार पात्र शेतकरी कर्जमाफीला मुकले; साडेपाचशे कोटी अडकले

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत पात्र असतानाही तांत्रिक अडचणींमुळे तब्बल ५० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. अजूनही या शेतकऱ्यांचे साडेपाचशे कोटी रुपये अडकले आहेत. परिणामी, कर्जमाफी कधी होईल, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.

तत्कालीन राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेची घोषणा केली. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून मागविण्यात आलेत. अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यात रेड, येलो व ग्रीन अशा याद्या तयार करण्यात आल्यात. ग्रीन यादीतील शेतकऱ्‍यांना कर्जमाफी देण्यात आली. त्यानंतर रेड व येलो यादीतून ग्रीन यादीत आलेल्या शेतकऱ्‍यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्यात आली.

कर्जमाफीदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आल्यात. त्यामुळे शेतकऱ्‍यांना या अडचणींचा फटका बसला. कधी रक्कम उशिरा पोहोचली, तर कधी चुकीमुळे शेतकऱ्‍यांचे खाते क्रमांक जुळले नाही. काही शेतकऱ्‍यांचे आधार कार्ड क्रमांक जोडण्यात अडचणी होत्या. अनेकांचे बँक खाते क्रमाक जुळत नव्हते. काहींची कर्जमाफीची रक्कम भरायची होती. अशा अनेक अडचणींत प्रकरणे अडकली. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्‍यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही.

या काळात सरकार बदलले; मात्र अजूनही जिल्ह्यातील जवळपास ५० हजार शेतकऱ्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यात जिल्हा बँकेचे ३५ हजार तर राष्ट्रीयीकृत बँकेचे २० असे ५० हजार शेतकऱ्‍यां‍चा समावेश आहे. जिल्हा बँकेची कर्जमाफीची रक्कम साडेतीनशे कोटी रुपये, तर राष्ट्रीयीकृत बँकेची रक्कम दोनशे कोटी रुपयांच्या घरात आहे. ही रक्कम अजूनही बँकांना मिळालेली नाही. त्यामुळे पात्र असतानाही शेतकऱ्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. शासनाने यात लक्ष घालून शेतकऱ्‍यांना त्वरित कर्जमाफी द्यावी, अशी मागणी होत आहे.

कोरोनानंतर तांत्रिक अडचणींचा फटका

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रे अडचणीत सापडली आहेत. त्यात कृषी क्षेत्रही सुटलेले नाही. कोरोनाच्या काळात शेतकऱ्‍यांच्या शेतमालाला भाव नव्हता. शेतकऱ्‍यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागली. अशातच तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी अडकली आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्‍यांनाही बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT