File photo 
विदर्भ

शेतकऱ्यांना आता व्यापारी व्हावे लागेल : कृषिमंत्री

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शेतकरी संकटातून जात आहेत. अशा स्थितीत केंद्र व राज्य सरकार सर्व पातळ्यांवर शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांनी आता व्यापाऱ्यांप्रमाणे शेती करणे गजरेचे झाले आहे. त्यांनीही बाजारपेठेत उतरावे, असे आवाहन कृषिमंत्री डॉ. अनील बोंडे यांनी केले. शनिवारी (ता. सात) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नांगरे उपस्थित होते. बोंडे म्हणाले की, राज्यात बीजी-थ्रीला विक्री परवानगी नाही. मात्र, काही भागात त्याची लागवड झाली आहे. नोंदणीकृत कंपन्या नसल्याने कारवाई करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा कठीण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. "मोनोक्रोटोफॉक्‍स'मुळे शेतकऱ्यांना विषबाधा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या औषधीवर तीन महिन्यांसाठी बंदी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात विषबाधेच्या घटना समोर आल्या होत्या. त्या आज कमी झाल्या आहेत. शंभर टक्‍क्‍यांवरून हे प्रमाण आठ टक्‍क्‍यांवर आणले आहे. येत्या काळात ते प्रमाणही कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची खरेदी विक्री करता यावी, तसेच माल साठवणूक करता यावी, यासाठी प्रत्येक गावात कृषिभवन तसेच कृषी गोदाम तयार केले जाणार आहे. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न कृषी विभाग करीत असल्याचे कृषिमंत्री डॉ. बोडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT