Farmers prefer NAFED for selling Cicers Yavatmal sakal
विदर्भ

हरभरा खरेदीने नाफेडची ‘बोहणी’; ३३ हजार क्विंटल, १७ कोटींची खरेदी

खासगी बाजारात हरभऱ्‍याला साडेचार हजार भाव आहे. नाफेड ५ हजार २३० रुपये दरात खरेदी करीत आहे

चेतन देशमुख

यवतमाळ : शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ‘नाफेड’ला पसंती दिली आहे. खासगी बाजारात हरभऱ्‍याला साडेचार हजार भाव आहे. नाफेड ५ हजार २३० रुपये दरात खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या केंद्राकडे वळले आहेत. आतापर्यंत तब्बल १७ कोटी रुपयांचा हरभरा नाफेडने खरेदी केला आहे. यंदाच्या हंगामातील ही नाफेडची विक्रमी खरेदी आहे.

नाफेडने जिल्ह्यात तूर तसेच सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले होते. मात्र, खासगीत दोन्ही पिकांना चांगला भाव असल्याने शेतकऱ्‍यांनी नाफेडऐवजी खासगीला पसंती दिली. हरभरा खरेदीसाठी नाफेडने आठ केंद्रे सुरू केली होती. खासगी बाजारात चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. हरभऱ्‍याच्या बाबतीत हा अंदाज फेल ठरला.

खासगी बाजारात हरभरा पिकाला ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. दुसरीकडे, नाफेड हमीभावानुसार म्हणजेच ५ हजार २३० रुपये दर देत आहे. त्यांचा परिणाम यंदा दिसून आला. सोयाबीन, तूर नाफेडला मिळाले नसली, तरी हरभरा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आतापर्यंत तब्बल ३३ हजार क्विंटलची खरेदी नाफेडने आठ केंद्रांवर केली आहे.

जवळपास १७ कोटी रुपयांचा हरभरा नाफेडने खरेदी केला आहे. बाजारात भाव कमी असल्याने अजूनही शेतकऱ्यांची गर्दी नाफेडच्या केंद्रावर आहे. हरभराविक्रीसाठी शेतकऱ्‍यांना तुरीसारखी प्रक्रिया ठेवण्यात आली आहे. आधी ऑनलाइन नोंदणी, त्यानंतर मॅसेज आल्यानंतर हरभराविक्रीसाठी केंद्रावर घेऊन जायचा आहे.

सर्वच खरेदी केंद्रांवर ७ हजारांवर शेतकऱ्‍यांनी नोंदणी केलेली आहे. यातील केवळ २ हजार शेतकऱ्‍यांनी हरभरा विक्रीसाठी आणला आहे. अजूनही ५ हजार शेतकऱ्‍यांचा हरभरा बाजारात यायचा आहे. परिणामी नाफेडचा यंदाचा हरभरा खरेदीचा आकडा मोठा राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आठ केंद्रे

नाफेडने यंदा आठ केंद्रांवर हरभराखरेदी सुरू ठेवली आहे. यात महागाव, पांढरकवडा, दिग्रस, बाभूळगाव, आर्णी, पुसद, पाटण तसेच नेरचा समावेश आहे. पुसद केंद्रावर आतापर्यंत सर्वाधिक शेतकऱ्‍यांनी हरभरा विक्रीसाठी आणला आहे.

आतापर्यंतची स्थिती

  • एकूण खरेदी - ३३ हजार क्विंटल

  • शेतकरी संख्या - २ हजार १७१

  • किंमत - १७ कोटी २८ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

SCROLL FOR NEXT