Farmers sit in front of Sakoli tehsil Demand for extension of paddy purchase 
विदर्भ

शेतकऱ्यांचा साकोली तहसीलसमोर ठिय्या; धानखरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

साकोली (जि. भंडारा) : मुदतीत धान खरेदी होत नसल्याने आधारभूत धान खरेदी केंद्राची मुदतवाढ करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी साकोली तालुक्‍यातील सुमारे ७० शेतकऱ्यांनी साकोली तहसील कार्यालयामध्ये ठिय्या दिला. तहसीलदारांनी मुदत वाढवून देण्याचे आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात अनेक आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, ३१ मार्चनंतर हे केंद्र बंद होणार आहेत. तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांचे धान अद्याप खरेदी करण्यात आलेले नाहीत. धानखरेदीला केवळ दहा दिवस उरले असताना अनेक केंद्रांवर बारदाना उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. तसेच काही ठिकाणी गोडाऊन हाउसफुल झाल्याने दीड महिन्यापासून खरेदी बंद करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन प्रक्रिया राबविल्याने धान खरेदी करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांना धान विक्रीची अडचण निर्माण झाली. त्यामुळे एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरेदी केंद्रातून ३१ मार्चच्या मुदतीत धानखरेदी होत नसल्याने या आधारभूत धान खरेदी केंद्राची मुदतवाढ करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी साकोली तालुक्‍यातील सुमारे ७० शेतकऱ्यांनी साकोली तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले.

शेवटी तहसीलदारांनी दोन दिवसांची मुदत वाढवून या मागणीच्या संदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राह्मणकर, बाजार समितीचे संचालक मनीष कापगते, घनश्‍याम पारधी, सरपंच सुधाकर हटवार, पवन कुमार शेंडे, विश्वजित पडोळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT