Farmer Agitation sakal
विदर्भ

Farmer Agitation : नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा तहसिलदारांच्या कक्षात ठिय्या

पीक नुकसानाची भरपाई गेल्या सात ते आठ महिने होऊनही मिळाली नसल्याने एकलारा बानोदा येथील शेतकऱ्यांनी संग्रामपूर (जि. बुलडाणा) तहसिलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरु केले.

पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर - पीक नुकसानाची भरपाई गेल्या सात ते आठ महिने होऊनही मिळाली नसल्याने एकलारा बानोदा येथील शेतकऱ्यांनी संग्रामपूर (जि. बुलडाणा) तहसिलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरु केले. मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नसल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ११) हे आंदोलन केले.

यंदाच्या पावसाळ्यात संग्रामपूर तालुक्यात जोरदार अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूर आले होते. शिवाय या पाण्यात जमिनही खरडून गेली. एकलारा बानोदा येथे यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे, घरदाराचे नुकसान झाले. याचे पंचनामेही केल्या गेले. मात्र, मदत मिळाली नाही. शेतकरी गेल्या सात-आठ महिन्यांपासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. अद्याप कुठलीही मदत दिल्या गेली नाही. शासनाने नुकसानग्रस्तांना मदत द्यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या दिला.

दुसरीकडे तहसिलदार हे बैठकीच्या कारणाने जिल्हा मुख्यालयी गेलेले असल्याने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बोलायला कुणी सक्षम अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळेही शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिंदेंच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेटी टांगती तलवार, निवडणूक शपथपत्रात दिली खोटी माहिती

NEET Paper leak Case: नीट पेपरफुटीप्रकरणी महिलेला अटक; बिबवेवाडीतील मनिषा वाघमारे पोलिसांच्या ताब्यात; विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचविल्याचा संशय!

बाबो...! सिद्धार्थ जाधवची पत्नी आहे बिजनेसवुमन, स्वत:चा व्हिला आणि बरंच काही

Public Wifi Risk : पब्लिक Wi-Fi वर चुकूनही करू नका 'ही' 3 कामे, नाहीतर काही सेकंदांत होईल अकाऊंट बँक रिकामं, मोबाईल हॅक

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात जोरदार पावसाला सुरूवात

SCROLL FOR NEXT