accident.j
accident.j 
विदर्भ

भयानक! दुचाकी उसळून घुसली मिनिडोअरमध्ये, दोघांचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : कोणाचा काळ कुठे दबा धरून बसला असेल काही सांगता येत नाही. अपघाताने तर एका क्षणात होत्याचे नव्हते होते. कधी खराब रस्त्यांमुळे, कधी चालकाच्या चुकीमुळे तर कधी काहीच कारण नसतानाही अपघात होतात आणि त्यामध्ये नाहक जीव जातात. असाच एक भीषण अपघात विरूळ मार्गे धामणगाव रोडवर असलेल्या मांडवा या गावाजवळ झाला.

सायंकाळच्या वेळी एका दुचाकी आणि मिनिडोअरची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी उसळून सरळ मिनिडोअरच्या केबीनमध्ये घुसली. त्यात मिनिडोअरचा चालक आणि दुचाकीचा चालक यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर मागून येणारी दुसरी दुचाकी मिनिडोअरला येऊन भिडल्याने दोन युवक जखमी झाले.

मोहंमद असिफ आजवानी (वय 46, रा. दर्यापूर), असे मिनिडोअर चालक आणि राजेंद्र अंबादास बुटलेकर (वय 42, कृष्णा कॉलनी, धामणगाव) हे दुचाकी चालकाचे नाव आहे. दोघांचा या अपघातात मृत्यू झाला.
जखमीत अंकुश वानखडे (वय 21) व गोपाल बायस्कर (वय 21) यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंकुश वानखडे यांना धामणगाव, तर गोपाल बायस्कर यांना चांदूररेल्वे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

सविस्तर माहितीनुसार दुचाकी चालक राजेंद्र बुटलेकर हे विमा प्रतिनिधी होते. ते अमरावती येथील काम आटोपून आपल्या दुचाकीने धामणगावला परत जात होते. तर धामणगाव येथून मिनिडोअर क्रमांक एमएच- 30 ए बी 0076 काचा घेऊन दर्यापूरला जात होता. दुचाकीस्वार बुटलेकर यांचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी गार्डवर उसळून सरळ मिनिडोअरमध्ये घुसली. त्यात दोघांचाही मृत्यू झाला.

त्याचवेळी चांदूर मार्गे धामणगावला जाणारे दुचाकीस्वार अंकुश वानखडे व गोपाल बायस्कर यांची गाडी मिनिडोअरला येऊन धडकली. त्यात ते दोघे जखमी झाले. ते दोघेही धामणगाव येथे राहणारे असल्याची माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच चांदूररेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे हे घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी जखमींना उपचारासाठी पाठवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदूररेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास सुरू आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT