Father and girl dies due to electric shock at Chandrapur 
विदर्भ

सिंधी गावावर पसरली शोककळा; विजेचा धक्का लागल्याने बाप-लेकीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू

आनंद चलाख

राजुरा (जि. चंद्रपूर) : तालुक्यातील सिंधी गावातील शिवारात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेला स्वप्नील सत्यपाल चहारे (वय ३२ वर्ष ) व मुलगी सेजल स्वप्नील चहारे (५ वर्ष) या बापलेकींचा मोटार सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास सिंधी शेत शिवारात घडली. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजुरा तालुक्यात खरीप हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी अनेक गावांमध्ये मोटरपंपद्वारे शेतीला सिंचन केले जाते. तालुक्यातील सिंधी शेतशिवारात पिकांना पाणी देण्यासाठी स्वप्नील चहारे व मुलगी सेजल चहारे हे दोघेही शेतावर गेले होते. मोटर सुरू करण्यासाठी जवळ गेला असता मोटरला करंट असल्यामुळे स्वप्नील चहारे याला विजेचा धक्का लागला.

यावेळी मुलीने वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केले. यात तिलाही विजेचा धक्का लागल्याने घटनास्थळीच बापलेकीचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती गावात पसरताच शोककळा पसरली. घटनेची माहिती विरूर ठाण्याला देण्यात आली. यानंतर पोलिस निरीक्षक कृष्ण कुमार तिवारी यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कृष्णकुमार तिवारी पुढील तपास करीत आहे.

दोघेही एकुलते एक

मृत स्वप्नील हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तर मुलगी सेजल ही सुद्धा आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. चहारे कुटुंबीयांवर आलेल्या दुर्दैवी संकटामुळे गाव नि:शब्द झाला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT