Accident sakal
विदर्भ

Accident : दुचाकीस्वार बाप-लेकावर काळाचा घाला; कारची दुचाकीला जबर धडक

दुचाकीने लग्नाला जात असलेल्या बाप-लेकाचा विरुद्ध दिशेने वेगात येत असलेल्या कारने जोरात धडक दिल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

खापा\पाटणसावंगी - सावनेर तालुक्यात बाभुळखेडा परिसरातील पंचमुखी हनुमान मंदिरात दुचाकीने लग्नाला जात असलेल्या बाप-लेकाचा विरुद्ध दिशेने वेगात येत असलेल्या कारने जोरात धडक दिल्याने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. प्रमोद श्यामराव चौधरी (वय ५२) व पूर्वेश प्रमोद चौधरी (वय१८, दोघेही राहणार पाटणसावंगी, तालुका सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना पाटणसावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाटणसावंगी-बाभूळखेडा मार्गावरील कोलार नदी पुलावर रविवारी (ता.५)रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

बाभूळखेडा शिवारातील पंचमुखी हनुमान मंदिरात लग्न असल्याने प्रमोद व पूर्वेश दुचाकीने पाटणसावंगी येथून बाभूळखेडा येथे जात होते. दरम्यान, पाटणसावंगी जवळील कोलार नदीच्या पुलावर विरुद्ध दिशेने वेगात येत असलेल्या कारने (एमएच २९, टी ९१९१) त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच ४०,एम१४४५)जबर धडक दिली. धडक एवढी जबर होती की बापलेक दोघेही दुचाकीसह पुलाखाली जाऊन आदळले.

यात बाप-लेक दोघेही गंभीर जखमी झाले. त्यात वडिल प्रमोद यांचा जागीच मूत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हितज्योती फाउंडेशनचे हितेश बन्सोड यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोड यांनी गभीर जखमी असलेल्या पूर्वेशला उपचारासाठी पाटणसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना नागपूर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढिल तपास करित आहे.

शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार

प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींना डॉक्टर उपस्थित नसल्याने जखमीला उपचार मिळाला नाही म्हणून आरोग्य विभागावर रोष व्यक्त करत अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याने त्यांचे शवविच्छेदन सावनेरच्या ग्रामीण रुग्णालयात तर मुलाचे मेयो हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले.

सोमवारी दुपारी दोघांच्या पार्थिवावर सोबतच येथील संगमेश्वर घाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेऊन फरार अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : सदोष मतदार याद्यांवर निवडणूक घेणं ही आयोगाची करप्ट प्रॅक्टीस - उद्धव ठाकरे

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT