road accident road accident
विदर्भ

लग्नाची तारीख ठरवायला गेलेल्या बापलेकाचा मृत्यू

अपघात ऐवढा भीषण होता दुचाकी व चारचाकीचा चेंदामेंदा झाला

चित्रा कापसे

तिरोडा (जि. गोंदिया) : तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले यांच्या चारचाकी वाहनाचा वडेगाव सर्रा गावच्या गामखोरी नाल्याजवळ दुचाकीसोबत अपघात झाला. या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू (Father And son died) तर गाडी चालकाचा गोंदिया येथे नेत असताना मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. अपघात ऐवढा भीषण होता दुचाकी व चारचाकीचा चेंदामेंदा झाला.

प्राप्त माहितीनुसार, जितेश संपत आहाके (रा. कोडेबर्रा, मंगेझरी) याचा ईश्वरदास भलावी (रा. कोडेलवारा, कोयलारी) यांच्या मुलीशी लग्न जुळले होते. रविवारी जितेशचा मोठा भाऊ प्रताप संपत आहाके (३६), वडील संपत हुर्री आहाके (६५) व नातेवाईक हिरदेवसिंग आसाराम टेकाम (७०, रा. मंगेझरी) हे लग्नाची तारीख (८ मे २०२२) ठरवून कोडेलवारावरून कोडेबर्राकडे ट्रिपल सीट दुचाकीने निघाले.

मागून साळ्याच्या लग्नाहून येत असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले यांच्या चारचाकी वाहनाने तिरोडा साकोली रस्त्यावरील सर्रा गावाजवळील गामखोरी नाल्याजवळ दुचाकीला जोरदार धडक (Road Accident) दिली. या घडकेत दोघांचा जागीच मृत्यू (Father And son died) झाला व एकाला तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथून जिल्हा रुग्णालय गोंदिया येथे रेफर केले असता वाटेतच निधन झाले.

या अपघातात डॉ. चिंतामण रहांगडाले हे सुद्धा जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोंदिया येथे दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसर हादरला होता. या घटनेने नुकतेच घडलेल्या वर्धा अपघाताची आठवण ताजी झाली. या घटनेची चौकशी पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अभिजित जोगंदड, पोलिस नायक पुंडलीक ऊके करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT