The father is the killer of the newborn baby chandrapur crime news 
विदर्भ

धक्कादायक! बापच निघाला नवजात बाळाचा मारेकरी; शौचालयात आढळले होते अर्भक

सकाळ डिजिटल टीम

चिमूर (जि. चंद्रपूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयात आढळून आलेल्या नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणात बाळाच्या बापाला अटक करण्यात आली आहे. रोशन बबन वाघमारे (रा. कन्हाळगाव) असे आरोपी बापाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एक मार्च रोजी सफाई कामगार राजेश सुबराव शेट्टी शौचालयाची स्वच्छता करीत असताना नवजात बाळ आढळून आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पहाणी केली असता बाळ मृतावस्थेत होते. सफाई कामगार राजेश शेट्टी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाळाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून अहवालाची प्रतीक्षा पोलिसांना असतानाच उप जिल्हा रुग्णालयात लावलेल्या सीसीटीव्हीची मदत घेण्यात आली. फुटेजवरून पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले. त्या आधारे बाळाच्या वडिलाला अटक करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील कन्हाळगाव येथील रोशन बबन वाघमारे, पत्नी आणि मुलगी रुग्णालयातील शौचालयाकडे जाताना दिसत आहेत. पत्नी शौचासाठी शौचालयात गेलेली असताना व पती आणि मुलगी शौचालयाबाहेर उभे असल्याचे दिसून येत आहे. शौचालयातच पत्नीला प्रसूतीच्या कळा आल्याने ती ओरडाओरड करू लागल्याने पतीने शौचालयात घुसतानाही दिसून येत आहे. त्यामुळे शौचलायातच बाळ जन्मास येऊन त्याला शौचालयाच्या सीटमध्ये कोंबण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला.

काही वेळानंतर पत्नी, पती आणि मुलगी निघून गेल्याचे दिसून येत असल्याच्या सीसीटीव्ही फुटेजवरून नवजात बाळाच्या बापास अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनुसार समजते. सदर घटनेच्या पूर्वीच त्या महिलेला रुग्णालयातून सुटी दिली आणि सात महिन्यांच्या प्रसूतीत अडचण असल्याने योग्य ठिकाणी जाऊन उपचार करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती पुढे येत आहे.

मात्र, त्याच सायंकाळी घरी जाण्यापूर्वी त्या महिलेने शौचास गेल्यानंतर तिथेच बाळास जन्म दिला. नवजात बाळ मुलगी असल्याने वडिलाने शौचालयाच्या सीटमध्ये तिला कोंबून पत्नी आणि मुलीसह पळ काढला. शिवाय बाळाच्या अंगावर काचेच्या जखमा असल्याने बाळाला मारून विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयातच टाकल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

बापाने रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम सांभाळले

आरोपी बाप रोशन बबन वाघमारे याला मुलगा व मुलगी आहे. मुलाला फिटचा आजार आहे. मुलगीही आजारी असते. त्यामुळे आई-वडील हे नैराश्यात जीवन जगत होते. मात्र, जन्मास आलेले तिसरे अपत्य मुलगीच झाल्याने शौचालयात कोंबून मारले. विशेष म्हणजे आरोपी बापाने सन २०१४ ते २०१८ या कालावधीत चिमूर उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम सांभाळले आहे. शिवाय प्रसूतीबाबत त्याला बरीच माहिती असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT