Father kills two-month-old girl 
विदर्भ

ह्रदयद्रावक, दोन महिन्यांच्या चिमुकलीला बापानेच जमिनीवर आपटले

संतोष रोकडे

अर्जुनी-मोरगाव (जि. गोंदिया) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करून चक्क पोटच्या पोरीला जमिनीवर आपटून मारल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली. या संतापजनक प्रकारामुळे परिसरा खळबळ उडाली आहे. भवेश केशव राऊत (वय ३४ वर्षे, रा. करांडली) असे आरोपीचे नाव असून, नायरा भवेश राऊत (वय दोन महिने सात दिवस) असे मृत बालिकेचे नाव आहे.


अर्जुनी-मोरगाव पोलिस स्टेशनअंतर्गत मौजा खामखुरा येथे शुक्रवार, १८ डिसेंबर रोजी आरोपी भवेश केशव राऊत (वय ३४ वर्षे, रा. करांडली) याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करून तिला मारण्याची जीवे मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भवेश नेहमीच तिला मारहाण करायचा. शुक्रवारीही दोघांचा वाद सुरू होता, परंतु नेहमीचेच असल्याने शेजाऱ्यांनी सुरू असलेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

परंतु पती- पत्नीमधील वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या भवेशने कसलाही विचार न करता स्वतःच्या मुलीला पाळण्यातून काढून जमिनीवर जोरात आपटले. ज्यामुळे मुलीच्या डोक्याला जबर मार लागला. उपचारादरम्यान भंडारा सामान्य रुग्णालय येथे मुलीचा मृत्यू झाला.

पत्नीच्या तोंडी तक्रारीवरून २० डिसेंबर रोजी अर्जुनी-मोरगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. रजिस्टर क्रमांक 342/20 भादंवि कलम 302-323-506 प्रमाणे दाखल करण्यात आला. आरोपी भवेश केशव राऊत (वय ३४ वर्षे, रा. करांडली तालुका अर्जुनी-मोरगाव) याला अटक करण्यात आली.

पुढील तपास पोलिस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महादेव तोंडले, नायक पोलिस शिपाई विजय कोटांगले पुढील तपास करीत आहेत.


संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT