sweet mart01 
विदर्भ

आवडती मिठाई आणि कचोरी, समोसाही मिळणार...पण घरी घेवून जाण्यासाठी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना विषाणू संसर्ग प्रभाव नसलेल्या क्षेत्रातील स्वीट मार्ट व फरसाणीची दुकाने सोमवार, ता. 20 एप्रिलपासून दिवसातून दोन वेळेमध्ये सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र कोणत्याही प्रतिष्ठानात बसून खाण्याची सुविधा दिली जाणार नाही. सामाजिक अलगकिकरणाचे सर्व नियम पाळून पार्सल व्यवस्थाच सुरू राहणार आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार ज्या क्षेत्रात कोरोनाचा प्रभाव नाही तेथे प्रतिबंधित क्षेत्र सोडून 20 एप्रिलपासून काही प्रमाणात उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्‍ध्व ठाकरे यांनी रविवारी सकाळीच याबाबत घोषणा केल्यानंतर रविवारी सायंकाळी अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशाने सोमवारपासून सुरू राहणाऱ्या उद्योग आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्ट व फरसाणची दुकाने सकाळी 6 ते 12 व दुपारी 4 ते 7 या वेळेत चालू राहतील. 

अटी व शर्तीवर दुकाने चालू 
खाद्य-पेय विक्रेता असोसिएशनच्या मागणीनुसार दुपारी 4 ते 7 ही वेळ वाढवून देण्यात आली आहे. या वेळत पार्सल व घरपोच सुविधा देण्यात येणार आहे. बसण्याची कुठलीही व्यवस्था राहणार नाही. या अटी व शर्तीवर स्वीट मार्ट व फरसाणची दुकाने चालू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती खाद्य-पेय विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी दिली.

24 मार्चपासून बंद होती दुकाने
जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळली तर हाॅटेल व्यवसाय 24 मार्टपासूनच ठप्प होता. त्यात स्वीटमार्ट व फरसानच्या दुकानांचाही समावेश होता. 

कोट्यवधचे नुकसान
लाॅकडाउनच्या काळात 27 दिवस व्यवहार बंद राहिले. यात काळात हिंदू नव वर्षाला सुरुवात झाली. गु़डीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंतीला मिठाईचा व्यवसाय चांगला होतो. मात्र याच काळात स्वीट मार्टची दुकाने बंद राहिल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून न निघणारे असले तरी आता व्यवसाय सुरू होत असल्याने दिलासा मिळाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT