fifteen corona patients recovered 
विदर्भ

आनंदवार्ता! पंधरा रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णालयातून होणार सुटी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : उपचाराअंती बरे झालेल्या तब्बल पंधरा कोरोनाबाधित  रुग्णांना येत्या तीन दिवसात टप्प्याटप्प्याने डिस्चार्ज दिला जाणार आहे. 

स्थानिक कमेला ग्राउंड, हैदरपुरा आणि तारखेडा येथील प्रत्येकी एका कोरोनाबाधित महिलेचा 22 ते 24 एप्रिल दरम्यान मृत्यू झाला होता. संबंधित कुटुंबातील सदस्यांचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सलग 14 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचे नमुने प्रथम तपासणी अहवालात निगेटिव्ह आढळले आहेत.

संबंधितांचे नमुने दुबार तपासणीसाठी पाठविले जात आहेत. हेही नमुने निगेटिव्ह आल्यास येत्या तीन दिवसात त्यांना कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. यापूर्वी हाथीपुरा येथील एका कुटुंबातील चौघांसह एकूण पाच जणांना बरे झाल्यानंतर जिल्हा कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. शिराळा येथील कोरोना बाधित मृताच्या अधिक संपर्कातील व्यक्तींना डॉ. गोडे महाविद्यालयात तर कमी संपर्कातील व्यक्तींना वलगाव येथील क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यात तब्बल 240 व्यक्ती क्वारंटाइन आहेत. वरुड येथील एका अधिकाऱ्याचा नमुना निगेटिव्ह आढळला आहे; तथापि त्यांना काही दिवस होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आलेले आहे. कंवरनगर येथील यापूर्वी चार व्यक्ती पॉझिटिव्ह तर चार व्यक्ती निगेटिव्ह आढळल्या आहेत. स्थानिक मालवीय चौक ते चित्रा चौक या मार्गावर राहणाऱ्या एका राजकीय नेत्याच्या कुटुंबातील सात ते आठ व्यक्ती अधिक संपर्कातील आहेत. त्यांनाही बडनेरा मार्गावरील महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आलेले आहे.

हाथीपुरा येथे 2 एप्रिलला एका कोरोनाबाधित व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील चार व अन्य एक, अशा पाच रुग्णांना गत आठवड्यात डिस्चार्ज देण्यात आला होता. शहरात कोरोना संक्रमितांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची संख्या हळूहळू वाढते आहे, हे अत्यंत आशादायी चित्र मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT