Filed a case against the boyfriend on the complaint of marital 
विदर्भ

तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा तर नोंदवला, पण पुढे...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पतीला सोडून ती एकटी राहत होती, तिच्या आयुष्यात दुसऱ्या युवकाने प्रवेश केला. त्याने लग्नाचे आमिष दाखवून आठ ते नऊ वर्षांपर्यंत तिचे शारीरिक शोषण करून वाऱ्यावर सोडले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी (ता. 28) ला रात्री रोशन गवई (वय 28 ) विरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडितेने नोंदविलेल्या तक्रारीत सन 2006 पासून रोशनसोबत संबंध होते, परंतु मागील दोन महिन्यांपासून तो टाळत होता. पती व्यसनाधीन असल्याने तिने पतीला सोडून, एकटीच भाड्याच्या खोलीत राहत होती. रोशनला जाब विचारण्यासाठी ती त्याच्या गावी जाऊन आली, परंतु तो तेथेही दिसला नाही. त्याच्या नातेवाइकांनी तिला टाळले.

आठ ते नऊ वर्षांपर्यंत केवळ आश्‍वासनांवर ठेवून रोशनने आपल्यावर अत्याचार करून वाऱ्यावर सोडल्याचा आरोपी पीडितेने फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल तक्रारीतून केला. शुक्रवारपर्यंत (ता. 29) त्याला अटक झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी स्पष्ट केले. महिला उपनिरीक्षक ज्योती बळेगाव या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सुखाचा सुरू असलेला संसार सोडून एका मुलीची आई अविवाहित युवकाच्या प्रेमात पडली अन्‌ घरदार सोडून त्याच्यासोबत निघून गेली. त्याने तिला आठ वर्षे जवळ ठेवले. नंतर त्याने प्रेयसीला हाकलून दिले. आधी पतीला तिने, तर नंतर प्रियकराने तिला वाऱ्यावर सोडल्याने ती पोलिस ठाण्यात पोहोचली. परंतु, पोलिसांनीही तिला इकडून तिकडे चकरा मारायला लावल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती.

प्रेमाच्या ओढीने ती राजापेठ येथून पतीला सोडून मुलीसोबत प्रियकराकडे आली. अन्‌ लग्न न करता दाम्पत्याप्रमाणे ते राहू लागले. या काळात पतीनेही तिच्याकडे बघितले नाही. तिने पहिल्या पतीपासून घटस्फोटही घेतला नाही. आठ वर्षे विवाहित प्रेयसीसोबत राहिलेला प्रियकर गेल्या काही दिवसांपासून तिला टाळत होता. लॉकडाउनच्या काळात तो जिल्ह्यातील दुसऱ्या गावी गेला. कुटुंबीयांनी त्याचे लग्न एका युवतीसोबत जुळविले. याप्रकरण महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: पर्यटकांचा हिरमोड! देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हिणी घाट बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

SCROLL FOR NEXT