crime 
विदर्भ

प्रेमातील काटा दूर करण्याच्या प्रयत्नात स्वत:च अडकला आणि...

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : दुसऱ्यासाठी खड्डा खोदणारा स्वत:च त्या खड्ड्यात कधी पडेल, याचा नेम नसतो. ही म्हण तंतोतंत लागू पडेल, अशी घटना नुकतीच घडली. प्रेम कोणावर जडावे, हे काही कोणाच्या हातात नसते, मात्र जिच्यावर प्रेम जडले ती कोणाची तरी पत्नी असल्याने आणि तिचा पती याला खलनायक वाटत असल्याने याने सिनेमात शोभावी, अशी कहाणी रचली. आपल्या प्रेमिकेच्या पतीला फसवण्याचा गेम रचला आणि स्वत:च त्यामध्ये अडकला.

एका व्यक्तीचा दुसऱ्याच्या पत्नीवर डोळा होता. त्या दुसऱ्याचा अडसर दूर करण्यासाठी याने एका महिलेस वीस हजार रुपये देऊन तिला त्या महिलेच्या पतीविरुद्ध अत्याचाराची तक्रार देण्यास भाग पाडले. गुन्हाही दाखल झाला. परंतु गाडगेनगर पोलिसांनी एका निर्दोष व्यक्तीला फसविण्याचा डाव मोठ्या शिताफीने हाणून पाडला.

ओळखीतील व्यक्तीच्या पत्नीवर डोळा ठेवून हा डाव रचणाऱ्या युसूफ खान अजीज खान (वय 45) याला पोलिसांनी याप्रकरणात अटक केली. युसूफचे परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीकडे येणे-जाणे होते. संबंधित व्यक्तीच्या पत्नीवर त्याचा डोळा होता, परंतु तो व्यक्ती युसूफसाठी अडथळा ठरत होता, त्यामुळे तिच्या पतीला अधिकाधिक दिवस घराबाहेर ठेवण्यासाठी युसूफने योजना आखली. तो जेथे काम करीत होता, तेथील एका महिलेला त्याने विश्‍वासात घेतले. संबंधित व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास तिला सांगितले. परंतु तिने स्वत: हे काम न करता मैत्रिणीकडून पोलिसांत तक्रार दाखल करवून घेतली.

गाडगेनगर ठाण्यात 4 जून 2020 रोजी एका महिलेने तक्रार केली. तक्रारीत पीडितेने तिला एका व्यक्तीने कर्ज देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून नवसारी ते चांगापूर फाट्याजवळ झुडूपात नेले. तेथे पाणी पिण्यासाठी देऊन बेशुद्ध करून त्या व्यक्तीने 20 मे रोजी अत्याचार केला, असा आरोप केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर गाडगेनगर ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या नावाचे दोन व्यक्ती एकाच परिसरात राहत होते. त्यातील एका व्यक्तीला सुरुवातीला पोलिस ठाण्यात आणण्यात आले, त्याला संबंधित महिलेने ओळखले नाही, त्यामुळे त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला आणण्यात आले.

यादरम्यानच्या काळात तक्रार देणारी महिला आणि युसूफ खानचा प्लॅन पोलिसांच्या लक्षात आला व त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केला. पोलिसांनी या दोघांची उलट तपासणी घेतली असता त्या दोघांनी तक्रार दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू पोलिसांपुढे मांडला. त्यामुळे एका निर्दोष व्यक्तीला अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यातून बाहेर काढणे पोलिसांना शक्‍य झाले. युसूफ खानने खोटी फिर्यादी म्हणून जिला उभे केले, तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला व युसूफ खानला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांकडून बी फायनल
अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला याप्रकरणातून बाहेर काढण्यासाठी हा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयापुढे मांडल्या जाईल. पोलिस त्यासाठी बी फायनलचा वापर करतील, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

एकीला 20 तर दुसरीस 10 हजारांचा लाभ
एका निर्दोष व्यक्तीविरुद्ध अत्याचार केल्याची तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेला युसूफ खानकडून 20 हजार तर जिच्या माध्यमातून ती आली तिला 10 हजार रुपये देण्यात आले होते.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDU19 vs SAU19 : 6,6,6,6,6,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचे आणखी एक वादळी शतक, आरोन जॉर्जसोबत आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई

Kidney Racket : एक कोटीत दडपला पीडिताचा मृत्यू! किडनी तस्करीत धक्कादायक खुलासा, गोपनीय अंत्यसंस्कार, दोन पीडित दगावले

Latest Marathi News Live Update : अजित पवारांचा शिवसैनिकांना मतदान करण्याचा आवाहन

Faf du Plessis ने इतिहास रचला! पाकिस्तानी शोएब मलिकचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, बनला जगातील पहिला फलंदाज ज्याने...

मीरा भाईंदरचे राजकीय समीकरण तिकीट वाटपात अडकले; निवडणूक का आणि कशी गुंतागुंतीची झाली? जाणून घ्या संपूर्ण आढावा...

SCROLL FOR NEXT