mseb 
विदर्भ

महावितरणाची आर्थिक स्थिती गंभीर; एकट्या अमरावती परिमंडळातील थकबाकी तब्बल 293 कोटींवर 

क्रिष्णा लोखंडे

अमरावती : ग्राहकांनी वीजदेयकांचा भरणा न केल्याने थकबाकी वाढली असून महावितरणची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. एकट्या अमरावती परिमंडळात 293 कोटींवर थकबाकी असून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण अमरावती परिमंडळच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे.

थकीत देयक वसूल करण्यासाठी वीज तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यास विरोध झाल्याने व विधिमंडळात हा मुद्दा गाजल्यानंतर राज्य सरकारने निर्णय होईस्तोवर वीज न कापण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या यानिर्णयाने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी महावितरण मात्र अडचणीत आले आहे. 

अमरावती परिमंडळात गेल्या वर्षभरात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतीलच 5 लाख 40 हजार ग्राहकांकडे 293 कोटी 65 लाख रुपये वीजबिलाची थकबाकी आहे. एवढेच नाही तर परिमंडळातील 1 लाख 79 हजार ग्राहकांनी एप्रिल 2020 नंतर एकदाही वीजबिल न भरल्याने त्यांच्याकडे वीजबिलाचे 145 कोटी 54 लाख रुपये थकले आहेत. 

महावितरणच्या एकूण वीजबिलाच्या रकमेपैकी जवळपास 85 टक्‍के खर्च हा वीज खरेदीवर होतो आणि 15 टक्‍क्‍यांत पगारापासून तर इतर सर्व प्रशासकीय खर्च करण्यात येतो. देयकांची वसुली झाली नसल्याने महावितरणचा व्यवहार ढासळू लागला आहे. महावितरणची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी ग्राहकांनी देयकांचा भरणा करावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

देयक भरून सहकार्य करावे

कोरोना संक्रमणाच्या काळात महावितरणने अखंडित सेवा दिली. देयक भरण्यासाठी ग्राहकांना तगादा लावण्यात आला नाही. ग्राहकांनीही देयक भरले नाहीत. परिणामी थकबाकी वाढली असून देयक भरल्या जात नसल्याने महावितरणच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. कंपनीचा डोलारा कोसळू नये, यासाठी ग्राहकांनी देयक भरून सहकार्य करावे, अशी विनंती महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT