Fine to people who are following corona rules  
विदर्भ

तीन रुग्णांसह लग्नसोहळा आणि आइस्क्रीम पार्लरला दंड; कोरोना नियमांचे उल्लंघन, मनपाची कारवाई

क्रिष्णा लोखंडे

अमरावती : मर्यादेपेक्षा अधिक वऱ्हाडींना आमंत्रित केल्याने लग्नसोहळा करणाऱ्यांना वीस हजार रुपये, राजकमल चौक येथील आइस्क्रीम पार्लरला सोशल डिस्टन्स न पाळल्याबद्दल आठ हजार रुपये त्याचप्रमाणे गृहविलगीकरणातील तीन रुग्णांना त्यांनी नियमभंग केल्याने पंचवीस हजार रुपयांचा दंड महानगरपालिकेकडून करण्यात आला.

न्यू कॉलनी व हमालपुरा या भागातील तीन कोरोनाबाधित रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्यांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे हमीपत्र दिले होते. मात्र त्याचे उल्लंघन केल्याने त्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंड करण्यात आला.

मंगलधाम परिसरातील ऋषभ कॉलनी येथे डकरे यांच्याकडे लग्नसोहळा सुरू होता. कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन समितीने लागू केलेल्या नियमानुसार लग्नसोहळ्यात वधू-वरासह फक्त वीस वऱ्हाडीनांच सहभागी होण्याची परवानगी आहे. या सोहळ्यात मात्र त्यापेक्षा अधिक लोकांचा समावेश आढळल्याने त्यांच्या विरोधात महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यांना वीस हजार रुपये दंड करण्यात आला.

राजकमल चौक येथील शिवशक्ती आइस्क्रीम पार्लरमध्ये सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याने मनपाच्या पथकाने आइस्क्रीम पार्लरला आठ हजार रुपये दंड केला. मनपाचे पशुवैद्यक अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे व बाजार परवाना विभागाचे अधीक्षक उदय चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचा वापर मतांच्या राजकारणासाठीचं, निवडणुक जवळ आली पाणीप्रश्‍न पेटला; स्थानिक नेत्यांकडून जनतेच्या समस्यांना केराची टोपली

Charlie Kirk: ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी एफबीआयने संशयिताला ताब्यात घेतले

IPS Anjana Krishna : 'IPS अंजना कृष्णा यांना दिली खोटी माहिती'; कुर्डूत 200 ट्रक वाळूचा दावा ठरला फोल, महसूल अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT