fines punished for non-use mask in akola murtizapur
fines punished for non-use mask in akola murtizapur 
विदर्भ

मास्क न वापरणाऱ्या 10 जणांना ठोठावला दंड

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) : मास्क न वापरता शहरात सुखेनैव संचार करणाऱ्या चौंघांवर दंडाचा बडगा उगारून मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी नियमभंग मोहीम कडक केली आहे.

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणु(कोविड १९)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सीमाबंदी, संचारबंदी, सोशल डिस्टंसिंग राखणे, मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी निर्बध लादण्यात आले आहेत. त्याअंतर्गत प्रशासनाने योजलेल्या उपायांचा भंग करणाऱ्यांवर येथील मुख्याधिकारी विजय लोहकरे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार पाळत ठेवून आहेत. ते स्वतः जातीने गावात गस्त देऊन निगराणी ठेवत आहेत.  येथील आठावडी बाजाराचा दिवस असल्याने बाजार भरणार नाही, यावर त्यांनी कटाक्ष ठेवला. बाजाराच्या कडेला थाटल्या गेलेल्या काही भाजीविक्रेत्यांच्या दुकानांवरील गर्दीला त्यांनी शिस्त लावली. 

याच गस्ती दरम्यान विजय लोहकरे यांना मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे काही लोक दिसले. कारवाईचा बडगा उगारत आशा १० नागरिकिंना त्यांनी प्रत्येकी २०० रुपये दंडा ठोठावून तंबी दिली. अमोल इंगाळे, तांगडे, अजय जाधव, शायर पवार, रसिक इंगळे, स्वप्निल वानखडे, भटकर, कन्हैया, दत्ता नाईक, संझय धुमाणी या १० जणांना मास्क न लावता शाहरात फिरून कायद्याचा भंग केल्यामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले व इतरांना धडकी भरली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रस्ता, बाजार, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालय, शासकीय कार्यालय आशा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना ३०० रूपये दंडाची, तर सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्यांना २०० रूपये दंडाची तरतूद आहे. फळ, भाज्या, किराणा, औषधी, जिवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी व ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंग पाळणे व विक्रेत्यांनी ग्राहकांना उभे रहाण्यासाठी चिन्हांकन करणे आवश्यक आहे. याचा भांग झाल्यास ग्राहकांना २०० रूपये व विक्रेत्यास २००० रुपये दंडाची तरतूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT